माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Monday 30 August 2010

प्रकार कंटेनर चे .........भाग ३

४) open top container : hard top container  प्रमाणेच हा पुढचा प्रकार.फरक इतकाच की छताची बाजू ही स्टील ची नसते. ती ताडपत्रीने झाकलेली असते.त्याचा हेतू एवढच असतो की सूर्यप्रकाश थोड्या-फार प्रमाणात आत यावा आणि दमात हवामानामुळे आतील कार्गो खराब होऊ नये.नाशवंत कार्गो साठी याचा उपयोग होतो.उदा.कांदा,लसूण वगैरे.
हा कंटेनर अश्या प्रकारचा असतो.
या कंटेनर चे जास्तीत जास्त वजन हे २४००० किलो २० फुटी साठी आणि ३०४८० किलो ४० फुटीसाठी ठरवलेले आहे.रिकाम्या कंटेनर चे वजन १८०० ते २४०० किलो २० फुटी चे आणि २८०० ते ४००० आणि ३९०० ते ४२०० किलो असते.म्हणजेच २० फुटी कंटेनर मध्ये २१६०० ते २२२०० किलो पर्यंत कार्गो भरता येतो.आणि ४० फुटी मध्ये २६२८० ते २७६८० किलो कार्गो भरता येतो.यावर जर त्याचे वजन गेले तर तो कंटेनर बाद ठरवण्यात येतो.
क्रमश :

प्रकार कंटेनर चे ...........भाग २

सुरुवातीला साधे कंटेनर प्रकार पाहिले.ज्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो.आता त्या पुढचे जरा सुधारित प्रकार पण आहेत.
३) hard top container :हा दिसायला जरी पहिल्या कंटेनर सारखा असला तरी यात फरक आहे.साध्या कंटेनर चे दार समोरून उघडता येते तसे या प्रकारच्या कंटेनर मध्ये समोरून आणि वरून हा कंटेनर उघडता येतो.कार्गो जर जास्त उंच (overheight  cargo )असेल तर हा कंटेनर वरून उघडा ही ठेऊ शकतो.आणि क्रेन च्या सहाय्याने हा कंटेनर भारता येतो.
पुढील छायाचित्रातून या कंटेनर ची कल्पना येईल.

Saturday 28 August 2010

प्रकार कंटेनर चे ....भाग १

कंटेनर म्हणजे काय हे तुम्हाला समजल असेलच.आता त्यातही प्रकार असतातच.अश्या या कंटेनर चे १० प्रकार आहेत.
१)standard container :हा सगळ्यात पहिला प्रकार आहे.general purpose साठी याचा उपयोग होतो.२० फुट मध्ये हे कंटेनर असतात.
याला दोन बाजूने दार असतात.याचा नंबर दारावर लावलेला असतो.कंटेनर भरल्यावर बंद केल्यावर एक कुलूप लावण्यात येते.त्याला सील म्हणतात.ते सील या प्रकारचे असते.

या सील वर एक नंबर लिहिलेला असतो.कंटेनर नंबर आणि सील नंबर ला खूप महत्व असते.
 इथे सहज कळेल कि सील कुठे लावतात ते!सरकारी अधिकाऱ्याच्या देखरेखी खाली हे सील लावले जाते.
२) high cube container :हे थोडे लांबीला मोठे असतात.आणि ४० फुटमध्ये येतात.

क्रमश: .............

Thursday 26 August 2010

क.......क........ .कंटेनर चा

आयात निर्यात क्षेत्रातली बाराखडी चालू करतीये!!आता तुम्ही म्हणाल हि पहिली -दुसरीच्या वर्गाचा  तास गेह्तीये का?पण ही सगळी क्षेत्रच अशी आहेत की बाराखडी पासून शिकावच लागतं!त्या शिवाय पुढे जाताच येत नाही !!!एम एस ची चित्रा च्या अपघात नंतर तुम्ही या कंटेनर गोष्टीशी परिचयाचे असालच.
आता कंटेनर म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एक आयताकृती डब्बा!!तो असा असतो .....
साधारण १७८० च्या आस-पास याची सुरुवात झाली. प्रामुख्याने याचा उपयोग कोळसा वाहून नेण्यासाठी केला जायचा.आणि तो ही नदी किंवा तलावात!!!यासाठी loose boxes वापरले जायचे.१८३० मध्ये छोटे कंटेनर वापरले जायचे.आताच्या तुलनेत हे कंटेनर खूपच छोटे होते.१८४० मध्ये लाकडी आणि लोखंडी कंटेनर वापरले जायचे.
१९०० च्या सुमारास चाहु बाजूनी बंद कंटेनर ची संकल्पना आली.१९२० मध्ये ५ ते १० फुटी कंटेनर यु के मध्ये रेलवे मध्ये वापरले गेले.
१९५५ मध्ये व्यावसायिक आणि ट्रक कंपनीचा मालक malcolm Mclean ने keith Tantlinger या अभियान्त्यासोबत अत्याधुनिक कंटेनर तयार केला.जो पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगा होता.त्यात मोठे आव्हान होते की त्याला बोटीवर चढवता येण्यासाठी आणि बोटीवर हलू नये यासाठी काहीतरी सुविधा हवी.त्यातून ८ फुट उंच,८ फुट रुंद आणि १० फुट लांब असा कंटेनर २५ एम एम च्या स्टील मधून तयार केला गेला.कंटेनर च्या चारी बाजूला twist lock बसवण्यात आले होते.जेणेकरून कंटेनर सोप्या पद्धतीने करेन च्या सहाय्याने हलवता येईल.इथून खरी आंतराष्ट्रीय पातळीवर सुरुवात झाली.
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने हे कंटेनर सैनिकांचे समान वाहून नेण्यासाठी केला (आता दुसरे महायुद्ध कधी झाले हा प्रश्न विचारू नका)
कोरियन युद्धाच्या वेळेस शस्त्रास्त्रे तसेच इतर संवेदनशील गोष्टी वाहून नेण्यासाठी केला गेला.पण लाकडी कंटेनर ची मोड तोड आणि चोरी होणे यामुळे आर्मी ने स्टील च्या कंटेनर ची गरज आहे हे लक्षात आणून दिले आणि तेव्हापासून हे कंटेनर चे बाळ सुधारत गेले.
आता हे कंटेनर २० फुट,४० फुट,४५ फुट,४८ फुट आणि ५३ फुट या आकारामध्ये उपलब्ध आहेत.
भारतात ७५% कंटेनर मार्फत होणारी आयात-निर्यात ही जे एन पी टी आणि चेन्नई वरून होते!!!!!
मग विचार करा जे एन पी टी मध्यंतरी  अपघातामुळे बंद होते तेव्हा केवढे नुकसान झाले असेल!!
हे कंटेनर वाहून नेणारी वेगळी जहाजे पण आहेत.त्यांना containerized ships म्हणतात.त्याची एक झलक पाहू....
आता कंटेनर चे  प्रकार पुढच्या भागात...........