माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Monday 22 November 2010

जन्मसिद्ध हक्क

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !!टिळकांचे हे वाक्य म्हणजे अफतातून होते.
या वाक्यात थोडा फार बदल करून आम्ही वापरतो एवढच !!कारण टिळक पण पुण्याचेच आणि मी सुद्धा पुण्याचीच!!
 आता माझे जन्मसिद्ध हक्क म्हणजे फटकळ पणे बोलणे,पायात पाय घालून समोरच्याला पाडणे,गडगडाटी हास्य करणे वगैरे!!आता त्यात जन्मजात असलेली गोष्ट म्हणजे धडपडणे !
आता  माझ्या लहान पणीची गोष्ट !!साधारण २ १/२ वर्षाची असतानाची ! (अर्थात हे माझ्या आई ने सांगितले अनुभव.उगाच तुला एवढ्या लहान पणाच मला कस आठवतंय हे विचारू नका!)
रोज संध्याकाळी आई सोबत फिरायला जायचं हा छंद !!आणि नुकतेच आई ने वाचायला शिकवले होते.तोंड वर करून रस्त्यावरच्या पाट्या वाचणे,बस,ट्रक रिक्षा वर लिहिलेले वाचणे हा नेहेमीचा उद्योग.एका शिंप्याच्या दुकानासमोर कायम धडपडायचे !!
कारण- वर बघून वाचत चालणे !!(हम ने ऐसा किया हि  क्या ही जो हम नीचे देखे !!-साभार-गनुबा- पापड पोल)
बरेच दिवस त्या शिंप्याने बघितले .एक दिवस आई ला म्हणाला ,"ताई म्हसोबाला कोंबड सोडा !पोरगी रोज एकाच जागी पडतीया !!" 
आता आईला हसावं का रडावं कळेना !!आता या पोरीमुळे काय काय दिव्य करावी लागनारेत हा विचार तिच्या मनात चमकून गेला असावा !!
आणि अजूनही हा हक्क मी बजावतिये!!
निर्विवाद पणे !!

Wednesday 10 November 2010

दिवाळी संपली रे.........

दिवाळी शी माझे काही वाकडे नाही.पण त्या सोबत आलेल्या प्रश्नांनी मी हैराण झाले होते.आणि नेहेमीप्रमाणे माझे प्रश्न शत्रू (?) होते नेहेमीप्रमाणे माझी भाचे कंपनी! आणि नेहेमीप्रमाणे असे प्रश होते कि ज्याची उत्तरे माझ्याकडे नव्हती.
त्यातल्या एकाशी पहिल्यादिवशी झालेला हा (सु)संवाद (?)
"आत्या,दिवाळी साठीच गाणं कोणत ग?"
"दिन दिन दिवाळी,गाई म्हशी ओवाळी..."पुढे मी काही म्हणायच्या आताच त्याने हाताने "बास"असा इशारा केला ...चला सुटलो ,कारण पुढच गाणं मला येत नाही हे त्याला कळणार नाही असा मी मनात म्हणे पर्यंत त्याचा प्रश्न "गाई म्हशी ओवाळतात ना ?मग तेल लाऊन अंघोळ झाल्यावर आई आपल्याला का ओवाळते ?गाई म्हशींना का नाही?"
माझी विकेट पडलेली !!!
वेळ मारून  न्यायला मी म्हटलं " अरे ,गाई-म्हशींना पण ओवाळतात "वसू बारसेला" आणि आपल्याला अभ्यंग स्नानाच्या दिवशी!!"
लगेच त्याचा पुढचा प्रश्न "मग गाई म्हशींना तेल लाऊन अंघोळ का नाही घालत?"
"ते तू आईला विचार "-इति मी 
हा (सु)संवाद (?) इथे संपला 
खरे फटके लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फुटले 
"मावशी,लक्ष्मीपूजन म्हणजे पैश्याची पूजा ना ?"
बरोबर -मी 
म्हणजे घरात असलेली लक्ष्मी वाढावी म्हणून हि पूजा करतात ना ?
हो .मी -किती शहाणी आहे ,लहान असून पण तिच्या आईने सांगितलेलं कस लक्षात ठेवलंय असं मी म्हणेपर्यंत(अर्थात मनातल्या मनात) तिचा निरुत्तर करणारा प्रश्न माझ्यावर सुतळी बॉम्ब पेक्षा  मोठ्या आवाजात फुटला 
मग त्या दिवशी एवढे  फटके का फोडतात ?-इति रुचा 
आनंद साजरा करण्यासाठी !  
मग हे असे इतके फटाके फोडून लोक पैसे वायाच घालवतात ना?त्यात प्रदूषण किती होते .असे पैसे वाया घालवून आणि घरात लक्ष्मीची पूजा करून पैसे कसे वाढणार ???
त्यापेक्षा नको ती दिवाळी आणि नको ते फटाके ......
.
.
 
 




 या प्रश्नांचे उत्तर आहे का कोणाकडे???

Saturday 18 September 2010

जहाज भरतात कसे ???

मागच्या ७  पोस्ट मध्ये कंटेनर चे प्रकार बघितले.हे कंटेनर जहाजावर चढवतात आणि उतरवतात कसे हा प्रश्न अनेकांना पडला असेल कारण २२-२५ टन वजनाचा कंटेनर उचलणे ही माणसासाठी तरी अशक्यप्राय गोष्ट आहे त्यासाठी क्रेन चा वापर केला जातो.आता ते कसे केले जाते हे शब्दात सांगणे जरा किचकट आहे त्यासाठी हा पुढचे चलचित्र अर्थात video बघा.







हे कंटेनर रस्त्यावरून ने-आण करण्यासाठी कंटेनर ट्रेलर चा उपयोग केला जातो.हेच कंटेनर ट्रेलर कंटेनर भरल्यावर पोर्ट ला नेले जातात आणि जहाज जिथे धक्क्याला लागते (याला आम्ही berth  म्हणतो )तिथे या क्रेन ची सोय केलेली असते.क्रेन च्या सहाय्याने कसा कंटेनर ट्रेलर वरून उचलतात हे वरच्या video  मधून लगेच लक्षात येते.
पुढच्या video मध्ये अजून जरा विस्तृत माहिती मिळेल.म्हणजे ही क्रेन कशी चालवतात,कंटेनरया क्रेन मध्ये कसा धरून उचलला जातो वगैरे.


कशी वाटली ही माहिती ??नक्की सांगा......

प्रकार कंटेनर चे ........भाग ७

कंटेनर मधले शेवटचे २ प्रकार म्हणजे bulk container आणि tank container .
बल्क म्हणजे सुटे भरलेले.कोणत्याही पिशवीत न भरता कंटेनर मध्ये सुटे भरले जाते.शक्यतो धान्य या प्रकारच्या कंटेनर मध्ये भरले जाते.यात वरच्या बाजूला ३ बाटलीच्या झाकणासारखी दारे असतात.म्हणजे हा कंटेनर दिसायला साध्या कंटेनर सारखा असतो फक्त वरच्या बाजूने वेगळेपणा जाणवतो.
 आणि दाराला खालच्या बाजूला कार्गो बाहेर काढण्यासाठी जागा असते.या फोटो वरून ते लक्षात येईल.
 tank container :नावावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की जलमय पदार्थ वाहून नेले जातात.त्याची रचना साधारण पणे अशी असते
या मध्ये कळतच आहे की वरच्या बाजूला उजव्या हाताला हा कंटेनर भरण्यासाठी सोय केलेली आहे.विशिष्ट तापमान यामध्ये ठेवावे लागते.फळांचे रस,खाद्यतेले.कच्ची तेले,तसेच ज्वालाग्राही जल पदार्थ वाहून नेले जातात.

असे हे कंटेनर चे एकूण १० प्रकार आहेत.आता हे कंटेनर जहाजावर कसे ठेवले जातात आणि कसे उतरवले जातात ते बघूया पुढच्या पोस्ट मध्ये...........


Monday 13 September 2010

"चोकलेट" मय मी !!!!!

कामापासून जर वेगळी पोस्ट.त्याच काय न मला आहे जाम कंटाळा अभ्यासाचा.आणि पोर्ट,कंटेनर च्या पोस्ट म्हणजे माझा अभ्यासच.म्हणून जरा ही वेगळी पोस्ट.
एक छोटीशी मजेशीर गोष्ट.खूप जुनी म्हणजे मी शाळेत असतानाची.माझी शाळा एका चहुबाजूने बंद वाड्यात आहे.म्हणजे चार बाजूने दुमजली इमारत आणि मध्यभागी पटांगण!!मधल्या सुट्टीतला आवडता छंद म्हणजे पटांगणावर खेळणे.धुडगूस घालायचो नुसता!!
 नेहेमीप्रमाणे मी मैत्रिणीसोबत पकड-पकडी खेळत होते.माझाय्वर कधी नव्हे ते राज्य आले होते.पटांगणावर एका बाजूला कुंड्यांना पाणी घालताना चिखल झाला होता.मी मैत्रिणीच्या मागे तिला पकडायला धावले.ती नेमकी त्या चिखलाच्या बाजूला पाळली.तिच्यामागे मीही!!समोरच भिंत असल्याने ती एकदम वळली आणि मीही तशीच वळायला गेले आणि..............मला काही कळायचं आतच........
धपाक असा आवाज झाला !!!!!!!!मी त्या चिखलात साष्टांग नमस्कार घातला !!!!!!!मला आधी कळलच नाही .माझ्या नंतर लक्षात आल की आपण चिखलात पडलोय.............डुक्कर चिखलात फिरल्यावर जस एका बाजूने चोकलेट मय होत ,तशीच मी दिसत होते!!!!
मी त्या चिखलाने माखले  होते!!!आणि संपूर्ण शाळा माझ हे चिखलमय ध्यान बघायला धावली होती!!!!अशी मी चिखलाने चोकलेट मय झाले होते!!!!आणि सगळ्यांची हसून हसून वाट लागली होती!!!आणि मलाही मग हसायला आले.....
आणि एवढ होऊन पण पुन्हा मी ड्रेस बदलून खेळायला हजर!!!!!
त्यादिवशी माझी वर्षातली दुसरी धुळवड झाली होती हे वेगळे सांगायला नकोच!!!!!

Wednesday 8 September 2010

प्रकार कंटेनर चे .......भाग ६

8 ) Refrigerated and insulated containers :या कंटेनरमध्ये वातानुकुलीत यंत्रणा असते.जहाजावरून जाताना विद्युत यंत्रणेला जोडलेले असतात.पोर्ट वर सुद्धा विद्युत यंत्रणा असतात.आणि रस्त्याने नेताना जनित्राच्या सहाय्याने आतील हवेचे तापमान स्थिर ठेवले जाते.हा कंटेनर अश्या प्रकारे तयार  केलेला आहे की बाहेरून दिसताना तो सध्या कंटेनर सारखाच दिसतो.

अश्या  प्रकारे थंड हवा  खेळती ठेवली जाते.
आणि त्या कंटेनर ची रचना अशी असते.


याचा उपयोग प्रामुख्याने फळे,भाज्या,मांस,दुग्धजन्य पदार्थ ,आयात-निर्यात करण्यासाठी होतो.
आणि  नाशवंत पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी जास्त असल्याने या प्रकारच्या कंटेनर चा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात होतो.


क्रमश :

Thursday 2 September 2010

प्रकार कंटेनर चे ................भाग ५

6) Ventilated Container :हा कंटेनर साध्या कंटेनर सारखाच दिसतो पण फरक हा आहे की याला हवा खेळती राहण्यासाठी झरोके असतात.मुख्यत्वे करून कॉफी च्या बिया आयात -निर्यात करण्यासाठी याचा उपयोग होतो.म्हणून याला कॉफी कंटेनर असेही म्हणतात.
कंटेनर च्या बाहेरील बाजूने असे झरोके असतात.
जिथे बाणाने दर्शवले आहे त्या भागात झरोके असतात..
वरील बाजूचे झरोके या प्रकारचे असतात.
आणि खालच्या बाजूने या प्रकारे झरोके असतात.