माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Saturday, 18 September 2010

जहाज भरतात कसे ???

मागच्या ७  पोस्ट मध्ये कंटेनर चे प्रकार बघितले.हे कंटेनर जहाजावर चढवतात आणि उतरवतात कसे हा प्रश्न अनेकांना पडला असेल कारण २२-२५ टन वजनाचा कंटेनर उचलणे ही माणसासाठी तरी अशक्यप्राय गोष्ट आहे त्यासाठी क्रेन चा वापर केला जातो.आता ते कसे केले जाते हे शब्दात सांगणे जरा किचकट आहे त्यासाठी हा पुढचे चलचित्र अर्थात video बघा.हे कंटेनर रस्त्यावरून ने-आण करण्यासाठी कंटेनर ट्रेलर चा उपयोग केला जातो.हेच कंटेनर ट्रेलर कंटेनर भरल्यावर पोर्ट ला नेले जातात आणि जहाज जिथे धक्क्याला लागते (याला आम्ही berth  म्हणतो )तिथे या क्रेन ची सोय केलेली असते.क्रेन च्या सहाय्याने कसा कंटेनर ट्रेलर वरून उचलतात हे वरच्या video  मधून लगेच लक्षात येते.
पुढच्या video मध्ये अजून जरा विस्तृत माहिती मिळेल.म्हणजे ही क्रेन कशी चालवतात,कंटेनरया क्रेन मध्ये कसा धरून उचलला जातो वगैरे.


कशी वाटली ही माहिती ??नक्की सांगा......

No comments:

Post a Comment