माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Wednesday 4 February 2009

दुधवाल्याची गाड़ी

माझी कॉलेज पासूनची वाईट सवय म्हणजे सगळ्या गोष्टीना काही ना काही नाव ठेवायची आणि त्याच नावाने त्या वस्तुला किवा त्या व्यक्तीला समबोधयाचे म्हणजे काम नीट न येनारयाना क्याक(quack),गोलमटोल लोकाना गणपति, वगैरे वगैरे .पण यामुळे अनेक गैरसमज होउनझालेला लोचा म्हणजे हा किस्सा।
बुलेट नावाची जी गाड़ी आहे त्याला मी "दुधावाल्याची गाड़ी " म्हणते .अशीच एक गाड़ी आमच्या सोसयटित आहे। एकदा माझी मैत्रिण आणि मी रात्रि शतपावली करत होतो.आमच्या सोबत एक काकू पण होत्या.तेवढ्यात ही गाड़ी आली आणि मी म्हणाले "दुधावाल्याची गाड़ी " तेवढ्यात माझी मैत्रिण म्हणाली "दूधवाला काय हेडफोन घालून येतो काय ?" आणि आम्ही जोरात हसलो।
आमच्या बरोबर असलेल्या काकू हे ऐकत होत्या .त्या घरी ज्याला निघाल्या.आणि जाता जाता म्हणल्या "चला आमचा दूधवाला आला " आणि त्या गेल्या।
त्या अस म्हटल्यावर आम्ही तिन ताड़ उडालोच .पुढचे काही क्षण आम्हाला समजलेच नाही पण लगेचच आम्हाला कळले की त्या गाडीवर आलेला माणूस म्हणजे त्यांचा मुलगा होता !!!!!!
त्या काकुनेही ते हसत हसत घेतले म्हणुन तेव्हा वाचले !!!!!!!
आता पुढे परत अश्या लोच्याच्या प्रसंगाची वाट बघतीये। त्यावर लेख लिहिण्यासाठी !!!!!!!

Saturday 17 January 2009

एका पंख्याची गोष्ट !!!!!

गोष्ट एक लग्नाची ,गोष्ट एक कॉलेजची सारखी ही गोष्ट नाही बर का! आता पंख्या सारख्या वस्तुची काय गोष्ट असणार ? असा प्रश्न नक्की पडला असेल तुम्हाला ॥
पण ही एक छोटीशी पण मजेदार अशी खरी गोष्ट आहे .......
माझ्या चुलत बहिणीच लग्न होत डोम्बिवली मधे .एक तर तिकडे सदानकदा उकाडा असतो.त्यामुळे पंखा हा अतिशय गरजेचा.लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे कार्यालयात पोहोचलो.सीमांतपूजन ,जेवण वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यावर झोप या गोष्टीवर चर्चा चालू झाली.कोणी कुठे आणि कस झोपयच याचा विचार चालू होता.महिला वर्गाने वधु पक्ष आधीच राखून ठेवला होता .त्यामुळे बाकीचे लोक मुकाट्याने बाहेर झोपायला आले
मी आणि माझी छोटी चुलत बहिण दोघिनी आधीच पंख्याखालाची जागा पटकावली होती .रात्रीचे १२.३० वाजून गेले होते त्यामुळे सगळे सगळे निद्रिस्त झाले होते.पण आम्हा दोघिना काही केल्या झोप येत नव्हती .एकतर उकाडा आणि डास!
आमच्या समोरच भिंतीवर एक पंखा होता .पण तो बंद होता.तो चालू करावा आणि झोपाव असा विचार करून अंधारात आम्ही धडपडत उठलो त्या भिंतीवर जवळपास वीसएक बटने होती.आता यातले नेमके त्या पंख्याचे बटन कोणते ?या विचारात असतानाच माझ्या बहिणीने एक एक बटन चालू करून बंद करायला सुरुवात केली
हा आमचा पराक्रम चालू असताना नेमकी एक ट्यूब चालू झाली आणि त्याच्या खाली झोपलेल्या माणसाने तोंडावरचे पांघरून काढून "कोण कडमडले रे तिकडे ??? ट्यूब कशाला हवीये आता ??गप गुमान झोपा " असे बोम्बलला आम्ही सटकलो.आणि सगली बटने चालू करून सुध्धा पंखा का लागला नाही ?या विचारात झोपून गेलो ।
सकाळी परत लग्नाची गड़बड़ सुरु झाली.सगळे विधि वगैरे झाले आणि अक्षता टाकायच्या बाकी होत्या.मी आणि माझी बहिण त्या पंख्याचाच विचार करत होतो.तो चालू का झाला नसावा दुसरीकडे कुठे त्याचे बटन आहे का ???
हे शोधत असतानाच रात्रीच्या त्या माणसाने आम्हाला त्या पंख्यापाशी बघितल आणि विचारल "रात्रि ट्यूब चे बटन तुम्हीच चालू बंद करत होतात ना ?" आम्ही घाबरून म्हणालो "आम्हाला पंखा चालू करायचा होता पण बटन सापडत नव्हते" तो माणूस मोठ्याने हसला आणि म्हणाला "अरे तो पंखा तर केव्हापासून नादुरुस्त आहे !!" आणि निघून गेला।
आमची रात्रीची जवळ जवळ एक तासाची मेहनत क्षणात उडाली होती तीही पंखा चालू नसताना !!!!!
तेव्हापासून कानाला खड़ा कुठेही गेलो तरी पंखा ,ट्यूब आदि विजेची उपकरणे चालू आहेत की नाही याची चौकशी करतो !!!!!!