स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !!टिळकांचे हे वाक्य म्हणजे अफतातून होते.
या वाक्यात थोडा फार बदल करून आम्ही वापरतो एवढच !!कारण टिळक पण पुण्याचेच आणि मी सुद्धा पुण्याचीच!!
आता माझे जन्मसिद्ध हक्क म्हणजे फटकळ पणे बोलणे,पायात पाय घालून समोरच्याला पाडणे,गडगडाटी हास्य करणे वगैरे!!आता त्यात जन्मजात असलेली गोष्ट म्हणजे धडपडणे !
आता माझ्या लहान पणीची गोष्ट !!साधारण २ १/२ वर्षाची असतानाची ! (अर्थात हे माझ्या आई ने सांगितले अनुभव.उगाच तुला एवढ्या लहान पणाच मला कस आठवतंय हे विचारू नका!)
रोज संध्याकाळी आई सोबत फिरायला जायचं हा छंद !!आणि नुकतेच आई ने वाचायला शिकवले होते.तोंड वर करून रस्त्यावरच्या पाट्या वाचणे,बस,ट्रक रिक्षा वर लिहिलेले वाचणे हा नेहेमीचा उद्योग.एका शिंप्याच्या दुकानासमोर कायम धडपडायचे !!
कारण- वर बघून वाचत चालणे !!(हम ने ऐसा किया हि क्या ही जो हम नीचे देखे !!-साभार-गनुबा- पापड पोल)
बरेच दिवस त्या शिंप्याने बघितले .एक दिवस आई ला म्हणाला ,"ताई म्हसोबाला कोंबड सोडा !पोरगी रोज एकाच जागी पडतीया !!"
आता आईला हसावं का रडावं कळेना !!आता या पोरीमुळे काय काय दिव्य करावी लागनारेत हा विचार तिच्या मनात चमकून गेला असावा !!
आणि अजूनही हा हक्क मी बजावतिये!!
निर्विवाद पणे !!
माझ्याबद्दल वाचू नये असे
- स्वप्ना
- एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!
Showing posts with label बालपण. Show all posts

Monday, 22 November 2010
Wednesday, 10 November 2010
दिवाळी संपली रे.........
दिवाळी शी माझे काही वाकडे नाही.पण त्या सोबत आलेल्या प्रश्नांनी मी हैराण झाले होते.आणि नेहेमीप्रमाणे माझे प्रश्न शत्रू (?) होते नेहेमीप्रमाणे माझी भाचे कंपनी! आणि नेहेमीप्रमाणे असे प्रश होते कि ज्याची उत्तरे माझ्याकडे नव्हती.
त्यातल्या एकाशी पहिल्यादिवशी झालेला हा (सु)संवाद (?)
"आत्या,दिवाळी साठीच गाणं कोणत ग?"
"दिन दिन दिवाळी,गाई म्हशी ओवाळी..."पुढे मी काही म्हणायच्या आताच त्याने हाताने "बास"असा इशारा केला ...चला सुटलो ,कारण पुढच गाणं मला येत नाही हे त्याला कळणार नाही असा मी मनात म्हणे पर्यंत त्याचा प्रश्न "गाई म्हशी ओवाळतात ना ?मग तेल लाऊन अंघोळ झाल्यावर आई आपल्याला का ओवाळते ?गाई म्हशींना का नाही?"
माझी विकेट पडलेली !!!
वेळ मारून न्यायला मी म्हटलं " अरे ,गाई-म्हशींना पण ओवाळतात "वसू बारसेला" आणि आपल्याला अभ्यंग स्नानाच्या दिवशी!!"
लगेच त्याचा पुढचा प्रश्न "मग गाई म्हशींना तेल लाऊन अंघोळ का नाही घालत?"
"ते तू आईला विचार "-इति मी
हा (सु)संवाद (?) इथे संपला
खरे फटके लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फुटले
"मावशी,लक्ष्मीपूजन म्हणजे पैश्याची पूजा ना ?"
बरोबर -मी
म्हणजे घरात असलेली लक्ष्मी वाढावी म्हणून हि पूजा करतात ना ?
हो .मी -किती शहाणी आहे ,लहान असून पण तिच्या आईने सांगितलेलं कस लक्षात ठेवलंय असं मी म्हणेपर्यंत(अर्थात मनातल्या मनात) तिचा निरुत्तर करणारा प्रश्न माझ्यावर सुतळी बॉम्ब पेक्षा मोठ्या आवाजात फुटला
मग त्या दिवशी एवढे फटके का फोडतात ?-इति रुचा
आनंद साजरा करण्यासाठी !
मग हे असे इतके फटाके फोडून लोक पैसे वायाच घालवतात ना?त्यात प्रदूषण किती होते .असे पैसे वाया घालवून आणि घरात लक्ष्मीची पूजा करून पैसे कसे वाढणार ???
त्यापेक्षा नको ती दिवाळी आणि नको ते फटाके ......
.
.
या प्रश्नांचे उत्तर आहे का कोणाकडे???

Monday, 13 September 2010
"चोकलेट" मय मी !!!!!
कामापासून जर वेगळी पोस्ट.त्याच काय न मला आहे जाम कंटाळा अभ्यासाचा.आणि पोर्ट,कंटेनर च्या पोस्ट म्हणजे माझा अभ्यासच.म्हणून जरा ही वेगळी पोस्ट.
एक छोटीशी मजेशीर गोष्ट.खूप जुनी म्हणजे मी शाळेत असतानाची.माझी शाळा एका चहुबाजूने बंद वाड्यात आहे.म्हणजे चार बाजूने दुमजली इमारत आणि मध्यभागी पटांगण!!मधल्या सुट्टीतला आवडता छंद म्हणजे पटांगणावर खेळणे.धुडगूस घालायचो नुसता!!
नेहेमीप्रमाणे मी मैत्रिणीसोबत पकड-पकडी खेळत होते.माझाय्वर कधी नव्हे ते राज्य आले होते.पटांगणावर एका बाजूला कुंड्यांना पाणी घालताना चिखल झाला होता.मी मैत्रिणीच्या मागे तिला पकडायला धावले.ती नेमकी त्या चिखलाच्या बाजूला पाळली.तिच्यामागे मीही!!समोरच भिंत असल्याने ती एकदम वळली आणि मीही तशीच वळायला गेले आणि..............मला काही कळायचं आतच........
धपाक असा आवाज झाला !!!!!!!!मी त्या चिखलात साष्टांग नमस्कार घातला !!!!!!!मला आधी कळलच नाही .माझ्या नंतर लक्षात आल की आपण चिखलात पडलोय.............डुक्कर चिखलात फिरल्यावर जस एका बाजूने चोकलेट मय होत ,तशीच मी दिसत होते!!!!
मी त्या चिखलाने माखले होते!!!आणि संपूर्ण शाळा माझ हे चिखलमय ध्यान बघायला धावली होती!!!!अशी मी चिखलाने चोकलेट मय झाले होते!!!!आणि सगळ्यांची हसून हसून वाट लागली होती!!!आणि मलाही मग हसायला आले.....
आणि एवढ होऊन पण पुन्हा मी ड्रेस बदलून खेळायला हजर!!!!!
त्यादिवशी माझी वर्षातली दुसरी धुळवड झाली होती हे वेगळे सांगायला नकोच!!!!!

Sunday, 23 May 2010
प्राण्यांची शाळा
आज ३ महिन्यांनी परत आलिये इथे.वाट चुकून!लिहायचं लिहायचं करत राहूनच गेलं.वेळच मिळत नाही हो!(आता वेळ काढायचा असतो हे मीच लोकांना सांगत फिरत असते ती गोष्ट वेगळी!)असो पण आज लिहायला मुद्दाच असा मिळालाय ना की बास!माझी भाचे कंपनी!या वेळच्या सुट्टीचा दौरा माझ्याकडे होता.रोज सकाळी गजर न लावता उठायची सोय झाली होती,रोज संध्याकाळी त्यांची बडबड ऐकणे ,त्यांच्या सोबत खेळणे आणि त्यात त्यांची भांडणे सोडवणे ह उद्योग होता.दिवसभर पिडायला मी सापडलेच नव्हते.पण रविवारी तो योग आला.आणि एकूण ५ जण माझ्या राशीला लागले.सगळे साधारण वय वर्षे ३ ते १० मधले!ही सगळी वरात घेऊन कात्रज सर्पोद्यानात जायचं ठरलं.सोबत मोठी मंडळी पण होतीच.(कारण ही पिल्लावळ घेऊन मी एकटी गेले असते तर ते मलाच हरवून घरी परत आले असते!)
तिथे आम्ही एक एक प्राणी बघत होतो.तिथल्या पाट्या वाचून माहिती घेत होते.(ज्यांना वाचणं शक्य नव्हतं त्यांच्या वाचून दाखवायचं काम अर्थातच माझ होतं)आणि तिथुनच माझ्या परिक्षेला सुरुवात झाली होती!माझं बौद्धिक घ्यायला सुरुवात घरातच झाली होती.सगळ्यांचं आवरुन झालं होतं.माझी गडबड चालु होती खाणं आणि पाण्याच्या बाटल्या,डोक्याचे रुमाल वगैरे साठी!त्यात माझी भाची रुचा आली आणि म्हणाली,"अगं मावशी लवकर आवर नाहीतर ते प्राणी फिरायला जातील!"
मला काय बोलावं तेच कळेना.मी गप्प.हिला काही कळतच नाही या आविर्भावात रुचा पुन्हा म्हणाली,"अगं,आज रविवार आहे ना,मग त्याना शाळेला सुट्टी असणार ना.मग ते फिरायला नाही का जाणार?"
इतक्यात दुसरी भाची सानिका म्हणाली,"प्राण्यांची शाळा कधी असते का?"
मी गार!दोघी माझ्याकडे उत्तरच्या अपेक्षेने बघत होत्या.पण आईने खाऊ साठी बोलावलं आणि मी थोडवेळ सुटले.
तिथे पहिलाच प्राणी बघितला हरीण!आणि यांचे प्रश्न सुरु!
"हरीण झोपते कसे?"
"त्याच्या डोक्यावर शिंग कशी उगवतात?"
मी माझ्या बुद्धीच्या झेपेप्रमाणे(?) जमेल तशी उत्तरे देत होते.
मग बघितली ति निलगाय!तिला निलगाय का म्हणतात याची माहिती सुदैवाने तिथे लिहिलेली होती.पुन्हा मी सुटले.पुढे गेलो कोल्हा,लांडगा बघायला.एकतर मला त्यातला फरक अजुनही कळत नाही.त्यात एकीला ती सगळी नावं इंग्रजी मधे सांगावी लागत होती.(पुन्हा पंचाईत)
आणि तिथे गेल्यावर छोट्या भावाने "ताई,इथे कुत्री कशाला ठेवलियेत ग?"असा प्रश्न टाकला!
पुढे हत्ती बघायला गेलो.भारतीय हत्ती आणि आफ्रिकन हत्ती अश्या दोन पाट्या तिथे होत्या.आणि तिथे दोनच हत्ती होते.दोघेही भारतीय वाटत होते!(हा निष्कर्ष माझा नाही!)
"दोन्ही पण हत्ती इंडियन आहेत ना?आफ़्रिकन बरोबर त्यांचं पटत नसेल म्हणुन त्याना नाही ठेवलय ना इथे?" इति रुचा.
"हो असेल तसं!" मी
पुढे साप बघायला गेलो!सापाला दोघीजणी घाबरत असल्याने जास्त प्रश्न आले नाहीत.पण सुसर-मगर बघत असताना सानिकाचा प्रश्न,"मावशी मगरीला दात किती असतात ग?"
माझी दांडी गुल!तोंड उघडे ठेवुन झोपलेल्या मगरीचे तिने मला दात मोजायला लावले!
कुठल्याच परिक्षेत कधिही नापास न झालेली मी यात मात्र भोपळ्यापेक्षाही कमी मार्काने नापास झाले!
हे प्रश्न कसे सोडवायचे या विचारातच घरी आलो.आणि रुचाला नेमका सकाळचा प्रश्न आठवला."मावशी प्राण्यांची शाळा का नसते ग?त्यांना बोलता का येत नाही?गाण्यातले प्राणी-पक्षी कसे बोलतात?प्राण्यांचा डॉक्टर असतो तर टिचर का नाही?"
मला तरी अजुन या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहियेत.तुमच्या कोणाकडे असतील तर मला नक्की सांगा हं!!!!!

Monday, 1 February 2010
पायापाशी दुनिया झुकाव ........वकाव.....
पायापाशी दुनिया झुकाव ....वकाव.....एका मराठी गाण्याचे हे शब्द .........हे सामर्थ्य आहे फक्त आणि फक्त आपल्या नविन पिढीच्या मुलांमधे ............अश्याच मुलांमधे काढलेला एक दिवस..........संस्मरणीय असा कालचा रविवार ठरला.त्याच झाल अस की महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमधे दिशा डेवलपमेंट ट्रस्ट आणि रोटरी क्लब सिंहगड रोड तर्फे आयोजित "सृजन वाग्यज्ञ २०१० " मधे जवळ जवळ १२०० शालेच्या मुला-मुलींची वक्तृत्व स्पर्धा होती.पाचवी ते दहावी च्या मुला-मुलींचा यात सहभाग होता.मी तेथे स्वयंसेवक म्हणून गेले होते.माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी ही होत्या.सकाळी ८.४५ पासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आम्ही अखंड फिरत होतो.धावपळ करत होतो.मुलाना वर्गात बसवणे, त्याना सगळ्या सूचना देणे,परिक्षकानी दिलेल्या मार्कांची बेरीज करून दुसर्या फेरिसाठी निवड,प्रत्येकाला दिल्या जाणार्या प्रशस्ति पत्रकांवर नावे घालणे आदि कामे आमच्याकडे होती.पण त्यातही खुप मजा आली.सगळ्या वयोगटाच्या मुलांसोबत गप्पा मारायला मिळाल्या.त्यांचे विचार ऐकायला मिळाले.
आपली नविन पीढ़ी काय विचार करते हे बघून आपण थकक होउन जातो.दुसर्या फेरितुं प्रत्येक इयात्तेमधाली ३ मुले आणि ३ मुली निवडल्या गेल्या.त्याना बक्षिसे "हरिशचंद्राची फक्टोरी चे दिग्दर्शक परेश मोकाशी "याच्या हस्ते देण्यात आली.ढोल-ताशाच्या गजरात हा समारंभ झाला.आणि विशेष म्हणजे प्तात्येक मुलाला प्रशस्ति पत्रक ,एक पुस्तक आणि एक रोप भेट म्हणून देण्यात आले.सुट्टीचा दिवस असून मुलांचा उत्साह प्रचंड होता.
माझ्या माहितीत अशी भव्य स्पर्धा प्रथमच घेण्यात आलीये."मराठी मागे पडलीये" जे बोलतात त्याना सांगावेसे वाटते की या आणि बघा...........
कालच्या सकाळ मधे "चला बोलूया चला ऐकुया "अशी या स्पर्धेची बातमी आलेली आहे.तुम्ही ती वाचली असेलच.
त्याची काही क्षणचित्रे ...........तुमच्यासाठी.........
आयोजक राउत सर परिक्षकाना सूचना देताना.
उपस्थित मुले..........
परेश मोकाशी यांच्या हस्ते बक्षिस स्वीकारताना विजेते मुले......आणि विशेष म्हणजे अंध मुलानी खुल्या गटातून बक्षिसे पटका वलियेत

आपली नविन पीढ़ी काय विचार करते हे बघून आपण थकक होउन जातो.दुसर्या फेरितुं प्रत्येक इयात्तेमधाली ३ मुले आणि ३ मुली निवडल्या गेल्या.त्याना बक्षिसे "हरिशचंद्राची फक्टोरी चे दिग्दर्शक परेश मोकाशी "याच्या हस्ते देण्यात आली.ढोल-ताशाच्या गजरात हा समारंभ झाला.आणि विशेष म्हणजे प्तात्येक मुलाला प्रशस्ति पत्रक ,एक पुस्तक आणि एक रोप भेट म्हणून देण्यात आले.सुट्टीचा दिवस असून मुलांचा उत्साह प्रचंड होता.
माझ्या माहितीत अशी भव्य स्पर्धा प्रथमच घेण्यात आलीये."मराठी मागे पडलीये" जे बोलतात त्याना सांगावेसे वाटते की या आणि बघा...........
कालच्या सकाळ मधे "चला बोलूया चला ऐकुया "अशी या स्पर्धेची बातमी आलेली आहे.तुम्ही ती वाचली असेलच.
त्याची काही क्षणचित्रे ...........तुमच्यासाठी.........
आयोजक राउत सर परिक्षकाना सूचना देताना.
उपस्थित मुले..........परेश मोकाशी यांच्या हस्ते बक्षिस स्वीकारताना विजेते मुले......आणि विशेष म्हणजे अंध मुलानी खुल्या गटातून बक्षिसे पटका वलियेत

मराठी पाउल पड़ते पुढे...................
Friday, 15 January 2010
तरुण तुर्क म्हातारे अर्क आणि लहान मुले ?
तरुण तुर्क म्हातारे अर्क हे गाजलेल नाटक जुने नाटक .ते नाटक रंगभूमीवर आल तेव्हा मी बहुतेक या जगात आलेच नव्हते .एक अप्रतिम कलाकृती बघायची राहून गेलीये.पण त्याची भरपाई म्हणून सीडी आणून त्याची पारायण केली.नुकतीच माझी भाची रुचा(वयवर्ष ७-८ ) येउन गेली.काहीतरी बघायचे करून संगणक लावून बसली आता तिला दाखवायचे काय असा प्रश्न होताच .सहज तरुण तुर्क च्या फोल्डर वर नजर केली आणि ते नाटक चालू केल.तिच्या वयाला ते झेपणार नाही आणि तीच बंद कर म्हणेल या अपेक्षेने लावले .पण तिनेच माझी विकेट काढली .संपूर्ण नाटक बघितल आणि तिची प्रश्न पेढ़ी चालू झाली .तिला मी हे नाटक का दाखवल ह्या प्रश्नाच उत्तर मी अजुन शोधतिये.तिचे नाटक दरम्यान प्रश्न असे होते की विचारायला नको .
नाटकामधला प्रसंग एक बंड्या (सुनील तावडे ) आणि प्यारया (राजन पाटिल )हे रूम चे सिनिअर .नुकत्याच एफवाय ला आलेल्या कुंदा (अतुल परचुरे )चे वस्त्रहरण करत असतात .
रुचाची गुगली "मावशी ते काय करतायत ?"
"अग ते न त्याला त्रास देतायत " इति मी .
"म्हणजे ते रागिंग करतायत ना?"
मी गार !!!!!(तिने ३ idiot बघितलेला आहे )
पुन्हा प्रश्न "मग त्याने मोठ्या प्यांट खाली हाल्फ प्यांट का घातली आहे?त्या ३ idiot सारखी चड्डी का घातली नाहीये ?"
माझ्याकडे उत्तर नाही .मी गप्प!!!आता तिला मी काय सांगणार ?तिच्या या का च उत्तर कोणाकडे मिळणार ?पण तिच "सांग ना !" चालू होत
"बाबाना विचार " इति मी
सुदैवाने तिचे बाबा आले नव्हते पण घरी जावून तिने विचारलेच आणि मी शिव्या खाल्ल्या
प्रसंग दोन प्यारया च एक वाक्य "थर्ड पर्सन सिंग्युलर साला !"
"मावशी तो खरच थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का ग?"इति रुचा (ती कॉन्वेंट मधे शिकातिये त्यामुले इंग्लिश ग्रामर छान मावशीच इंग्लिश म्हणजे आइ ऍम द गर्ल च्या लेवल च )
मी नुसतीच नाही या अर्थाने मान हलवली .ती जरा गप्प .मावशीनेएक तरी उत्तर दिल म्हणून खुश .पण तिला काय माहित की मावशिलाच "थर्ड पर्सन सिंग्युलर" नीटस नाहीये !!!!!
प्रसंग तीन धमी (संज्योत हर्डीकर )म्हणते "सर,ह्या बंड्या न त्यान ना ही किसड मी !!"
"तो किस दाखवला कुठे ?" रुचा
"अग ते लपले होते ना म्हणून आपल्याला दिसल नाही "मी सांगायचा एक प्रयत्न केला
"मग त्यानी बाहेर येउन का नाही केला?३ idiots मधे दाखवला ना!"
आता चक्कर येउन पडायची माझी वेळ होती !!!!!!
सुदैवाने माझ्या मैत्रिणी अवतरल्या आणि माझी सुटका झाली (तात्पुरती )
नाटक संपल्यावर ती लगेच घरी गेल्याने मी वाचले पण आगामी प्रश्नांच काय ??????
कोणाकडे वरच्या प्रश्नांची उत्तरे तर मला सांगा ह...............

Wednesday, 13 January 2010
तीळ आणि गुळ
एकदा एका बोक्याने ढकलले गुळ ला
त्यात वरुन पाडले तीळ ला
तीळ चिकटला गुळ ला
आणि लागला रडायला
म्हणाला "आता आपण चिकटलो
बिन कामाचेच झालो
आता आपल्याशी कोणीच बोलणार नाही,
आणि आपण कोणालाच आवडणार नाही !"
आवाज ऐकून छोटी ताई आली धावत
आणि तिला पाहून बोका सुटला पळत
उचलले तिने अलगत दोघाना
"रडू नका रे" म्हणाली त्याना
तुम्ही दोघे एकत्र सर्वाना आवडाल
एक मोठा आनंद दयाल
"तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला
सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका "
सगलेच खुश होउन तुम्हाला देतील-घेतील
मकर संक्रांतिचा आनंद लुटतील
तुमच्याशिवाय संक्रात होणार नाही साजरी
तुम्ही लावाल दरवर्षी हजेरी
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा सर्वाना देवुया
आणि या सणाचा आनंद लुटुया!!!!!!
ता क :कुठूनही साभार परत न आलेली एक बाल कल्पना !!!!!!!
त्यात वरुन पाडले तीळ ला
तीळ चिकटला गुळ ला
आणि लागला रडायला
म्हणाला "आता आपण चिकटलो
बिन कामाचेच झालो
आता आपल्याशी कोणीच बोलणार नाही,आणि आपण कोणालाच आवडणार नाही !"
आवाज ऐकून छोटी ताई आली धावत
आणि तिला पाहून बोका सुटला पळत
उचलले तिने अलगत दोघाना
"रडू नका रे" म्हणाली त्याना
तुम्ही दोघे एकत्र सर्वाना आवडाल
एक मोठा आनंद दयाल
"तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला
सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका "
सगलेच खुश होउन तुम्हाला देतील-घेतील
मकर संक्रांतिचा आनंद लुटतील
तुमच्याशिवाय संक्रात होणार नाही साजरी
तुम्ही लावाल दरवर्षी हजेरी
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा सर्वाना देवुया
आणि या सणाचा आनंद लुटुया!!!!!!
ता क :कुठूनही साभार परत न आलेली एक बाल कल्पना !!!!!!!
Saturday, 9 January 2010
बाल प्रश्न????
बाल मनाला पडणारे प्रश्न खरतर नेहेमीच कोडयात पाडणारे असतात.असे अनेक प्रश्न गेले कित्येक वर्ष मी ऐकतिये .नेहेमी प्रमाणे त्यासाठी माझ्याकडे उत्तर नाहीत.विशेष हे की असे प्रश्न कधीही केव्हाही कसेही येतात.ही प्रश्न विचारणारी मंडळी म्हणजे माझी भाचे कम्पनी .आणि आमच्या सोसायटी मधील सर्व लहान मुले.
ही पोस्ट आजच लिहायच कारण म्हणजे कालच आलेला नविन प्रश्न.सोसायटी मधल्या एकाने विचारलेला "ताई सायकल कशी चलते ग ?" ती कशी चालते हे त्याला सायकल समोर घेउन दाखवले ते त्याला पटल अस वाटेपर्यंत त्याचा दूसरा प्रश्न "मग आपण बाइक अशीच का चालवत नाही ?" मी गार !!!!! मी त्याला म्हटल "तू मोठा झालास की समजेल तुला " त्यावर त्याचा अजुन एक प्रश्न "मोठा म्हणजे तुझ्या सारखा ? मग तुला का माहित नाही ?" त्याच्या हा प्रश्नाच उत्तर मी अजुन शोधतिये!!!!
असेच अनेक प्रश्न कायम येतात त्यापैकी कही निवडक आणि निरुत्तर करणारे म्हणजे :फलांचा राजा आंबा का? तो तर केवढा लहान असतो .कलिंगड सगळ्यात मोठ मग तो का नाही ???"
सालिंदर नामक एक प्राणी पहिल्यांदा बघितलेला माझा मामेभाऊ!तो शत्रुवर काटे फेकतो वगैरे सांगुन त्याच्या माहितीत भर घालण्याचा प्रयत्न .त्यावर त्याचा प्रश्न "तो काटे कसे फेकतो ?मग ते काटे त्याला टोचत नाहीत का?मग एकदा काटे फेकले की परत कसे येतात ?"
घरोघरी चालू असलेला संवाद "पेट्रोल महान झाले आहे जास्त जालायाला नको वगैरे ?तसच आम्ही एकदा बोलत बसलो होतो मधेच माझा भाचा त्यावर म्हणाला " पेट्रोल जळत म्हणजे काय ?ते तर पाणी जसा असत तसच असत मग पाणी का जळत नाही ?पाणी तर रोज आपल्या नलाला येत मग तुम्ही गाडीत पाणी का घालत नाही "
अश्यासारखे बरेच प्रश्न माझ्यावर तूफ़ान हल्ला करत असतात .......एरवी इतराना गार करणारी मी ह्या मुलांसमोर शरणागति पत्कारते...........
हे प्रश्न तुम्हाला सुटले तर मला उत्तर नक्की सांगा.........आयुष्यात एकातरी लहान मुलाचे शंका समाधान करायची इच्छा आहे!!!!!

Subscribe to:
Posts (Atom)