माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Monday 22 November 2010

जन्मसिद्ध हक्क

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !!टिळकांचे हे वाक्य म्हणजे अफतातून होते.
या वाक्यात थोडा फार बदल करून आम्ही वापरतो एवढच !!कारण टिळक पण पुण्याचेच आणि मी सुद्धा पुण्याचीच!!
 आता माझे जन्मसिद्ध हक्क म्हणजे फटकळ पणे बोलणे,पायात पाय घालून समोरच्याला पाडणे,गडगडाटी हास्य करणे वगैरे!!आता त्यात जन्मजात असलेली गोष्ट म्हणजे धडपडणे !
आता  माझ्या लहान पणीची गोष्ट !!साधारण २ १/२ वर्षाची असतानाची ! (अर्थात हे माझ्या आई ने सांगितले अनुभव.उगाच तुला एवढ्या लहान पणाच मला कस आठवतंय हे विचारू नका!)
रोज संध्याकाळी आई सोबत फिरायला जायचं हा छंद !!आणि नुकतेच आई ने वाचायला शिकवले होते.तोंड वर करून रस्त्यावरच्या पाट्या वाचणे,बस,ट्रक रिक्षा वर लिहिलेले वाचणे हा नेहेमीचा उद्योग.एका शिंप्याच्या दुकानासमोर कायम धडपडायचे !!
कारण- वर बघून वाचत चालणे !!(हम ने ऐसा किया हि  क्या ही जो हम नीचे देखे !!-साभार-गनुबा- पापड पोल)
बरेच दिवस त्या शिंप्याने बघितले .एक दिवस आई ला म्हणाला ,"ताई म्हसोबाला कोंबड सोडा !पोरगी रोज एकाच जागी पडतीया !!" 
आता आईला हसावं का रडावं कळेना !!आता या पोरीमुळे काय काय दिव्य करावी लागनारेत हा विचार तिच्या मनात चमकून गेला असावा !!
आणि अजूनही हा हक्क मी बजावतिये!!
निर्विवाद पणे !!

Wednesday 10 November 2010

दिवाळी संपली रे.........

दिवाळी शी माझे काही वाकडे नाही.पण त्या सोबत आलेल्या प्रश्नांनी मी हैराण झाले होते.आणि नेहेमीप्रमाणे माझे प्रश्न शत्रू (?) होते नेहेमीप्रमाणे माझी भाचे कंपनी! आणि नेहेमीप्रमाणे असे प्रश होते कि ज्याची उत्तरे माझ्याकडे नव्हती.
त्यातल्या एकाशी पहिल्यादिवशी झालेला हा (सु)संवाद (?)
"आत्या,दिवाळी साठीच गाणं कोणत ग?"
"दिन दिन दिवाळी,गाई म्हशी ओवाळी..."पुढे मी काही म्हणायच्या आताच त्याने हाताने "बास"असा इशारा केला ...चला सुटलो ,कारण पुढच गाणं मला येत नाही हे त्याला कळणार नाही असा मी मनात म्हणे पर्यंत त्याचा प्रश्न "गाई म्हशी ओवाळतात ना ?मग तेल लाऊन अंघोळ झाल्यावर आई आपल्याला का ओवाळते ?गाई म्हशींना का नाही?"
माझी विकेट पडलेली !!!
वेळ मारून  न्यायला मी म्हटलं " अरे ,गाई-म्हशींना पण ओवाळतात "वसू बारसेला" आणि आपल्याला अभ्यंग स्नानाच्या दिवशी!!"
लगेच त्याचा पुढचा प्रश्न "मग गाई म्हशींना तेल लाऊन अंघोळ का नाही घालत?"
"ते तू आईला विचार "-इति मी 
हा (सु)संवाद (?) इथे संपला 
खरे फटके लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फुटले 
"मावशी,लक्ष्मीपूजन म्हणजे पैश्याची पूजा ना ?"
बरोबर -मी 
म्हणजे घरात असलेली लक्ष्मी वाढावी म्हणून हि पूजा करतात ना ?
हो .मी -किती शहाणी आहे ,लहान असून पण तिच्या आईने सांगितलेलं कस लक्षात ठेवलंय असं मी म्हणेपर्यंत(अर्थात मनातल्या मनात) तिचा निरुत्तर करणारा प्रश्न माझ्यावर सुतळी बॉम्ब पेक्षा  मोठ्या आवाजात फुटला 
मग त्या दिवशी एवढे  फटके का फोडतात ?-इति रुचा 
आनंद साजरा करण्यासाठी !  
मग हे असे इतके फटाके फोडून लोक पैसे वायाच घालवतात ना?त्यात प्रदूषण किती होते .असे पैसे वाया घालवून आणि घरात लक्ष्मीची पूजा करून पैसे कसे वाढणार ???
त्यापेक्षा नको ती दिवाळी आणि नको ते फटाके ......
.
.
 
 




 या प्रश्नांचे उत्तर आहे का कोणाकडे???

Saturday 18 September 2010

जहाज भरतात कसे ???

मागच्या ७  पोस्ट मध्ये कंटेनर चे प्रकार बघितले.हे कंटेनर जहाजावर चढवतात आणि उतरवतात कसे हा प्रश्न अनेकांना पडला असेल कारण २२-२५ टन वजनाचा कंटेनर उचलणे ही माणसासाठी तरी अशक्यप्राय गोष्ट आहे त्यासाठी क्रेन चा वापर केला जातो.आता ते कसे केले जाते हे शब्दात सांगणे जरा किचकट आहे त्यासाठी हा पुढचे चलचित्र अर्थात video बघा.







हे कंटेनर रस्त्यावरून ने-आण करण्यासाठी कंटेनर ट्रेलर चा उपयोग केला जातो.हेच कंटेनर ट्रेलर कंटेनर भरल्यावर पोर्ट ला नेले जातात आणि जहाज जिथे धक्क्याला लागते (याला आम्ही berth  म्हणतो )तिथे या क्रेन ची सोय केलेली असते.क्रेन च्या सहाय्याने कसा कंटेनर ट्रेलर वरून उचलतात हे वरच्या video  मधून लगेच लक्षात येते.
पुढच्या video मध्ये अजून जरा विस्तृत माहिती मिळेल.म्हणजे ही क्रेन कशी चालवतात,कंटेनरया क्रेन मध्ये कसा धरून उचलला जातो वगैरे.


कशी वाटली ही माहिती ??नक्की सांगा......

प्रकार कंटेनर चे ........भाग ७

कंटेनर मधले शेवटचे २ प्रकार म्हणजे bulk container आणि tank container .
बल्क म्हणजे सुटे भरलेले.कोणत्याही पिशवीत न भरता कंटेनर मध्ये सुटे भरले जाते.शक्यतो धान्य या प्रकारच्या कंटेनर मध्ये भरले जाते.यात वरच्या बाजूला ३ बाटलीच्या झाकणासारखी दारे असतात.म्हणजे हा कंटेनर दिसायला साध्या कंटेनर सारखा असतो फक्त वरच्या बाजूने वेगळेपणा जाणवतो.
 आणि दाराला खालच्या बाजूला कार्गो बाहेर काढण्यासाठी जागा असते.या फोटो वरून ते लक्षात येईल.
 tank container :नावावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की जलमय पदार्थ वाहून नेले जातात.त्याची रचना साधारण पणे अशी असते
या मध्ये कळतच आहे की वरच्या बाजूला उजव्या हाताला हा कंटेनर भरण्यासाठी सोय केलेली आहे.विशिष्ट तापमान यामध्ये ठेवावे लागते.फळांचे रस,खाद्यतेले.कच्ची तेले,तसेच ज्वालाग्राही जल पदार्थ वाहून नेले जातात.

असे हे कंटेनर चे एकूण १० प्रकार आहेत.आता हे कंटेनर जहाजावर कसे ठेवले जातात आणि कसे उतरवले जातात ते बघूया पुढच्या पोस्ट मध्ये...........


Monday 13 September 2010

"चोकलेट" मय मी !!!!!

कामापासून जर वेगळी पोस्ट.त्याच काय न मला आहे जाम कंटाळा अभ्यासाचा.आणि पोर्ट,कंटेनर च्या पोस्ट म्हणजे माझा अभ्यासच.म्हणून जरा ही वेगळी पोस्ट.
एक छोटीशी मजेशीर गोष्ट.खूप जुनी म्हणजे मी शाळेत असतानाची.माझी शाळा एका चहुबाजूने बंद वाड्यात आहे.म्हणजे चार बाजूने दुमजली इमारत आणि मध्यभागी पटांगण!!मधल्या सुट्टीतला आवडता छंद म्हणजे पटांगणावर खेळणे.धुडगूस घालायचो नुसता!!
 नेहेमीप्रमाणे मी मैत्रिणीसोबत पकड-पकडी खेळत होते.माझाय्वर कधी नव्हे ते राज्य आले होते.पटांगणावर एका बाजूला कुंड्यांना पाणी घालताना चिखल झाला होता.मी मैत्रिणीच्या मागे तिला पकडायला धावले.ती नेमकी त्या चिखलाच्या बाजूला पाळली.तिच्यामागे मीही!!समोरच भिंत असल्याने ती एकदम वळली आणि मीही तशीच वळायला गेले आणि..............मला काही कळायचं आतच........
धपाक असा आवाज झाला !!!!!!!!मी त्या चिखलात साष्टांग नमस्कार घातला !!!!!!!मला आधी कळलच नाही .माझ्या नंतर लक्षात आल की आपण चिखलात पडलोय.............डुक्कर चिखलात फिरल्यावर जस एका बाजूने चोकलेट मय होत ,तशीच मी दिसत होते!!!!
मी त्या चिखलाने माखले  होते!!!आणि संपूर्ण शाळा माझ हे चिखलमय ध्यान बघायला धावली होती!!!!अशी मी चिखलाने चोकलेट मय झाले होते!!!!आणि सगळ्यांची हसून हसून वाट लागली होती!!!आणि मलाही मग हसायला आले.....
आणि एवढ होऊन पण पुन्हा मी ड्रेस बदलून खेळायला हजर!!!!!
त्यादिवशी माझी वर्षातली दुसरी धुळवड झाली होती हे वेगळे सांगायला नकोच!!!!!

Wednesday 8 September 2010

प्रकार कंटेनर चे .......भाग ६

8 ) Refrigerated and insulated containers :या कंटेनरमध्ये वातानुकुलीत यंत्रणा असते.जहाजावरून जाताना विद्युत यंत्रणेला जोडलेले असतात.पोर्ट वर सुद्धा विद्युत यंत्रणा असतात.आणि रस्त्याने नेताना जनित्राच्या सहाय्याने आतील हवेचे तापमान स्थिर ठेवले जाते.हा कंटेनर अश्या प्रकारे तयार  केलेला आहे की बाहेरून दिसताना तो सध्या कंटेनर सारखाच दिसतो.

अश्या  प्रकारे थंड हवा  खेळती ठेवली जाते.
आणि त्या कंटेनर ची रचना अशी असते.


याचा उपयोग प्रामुख्याने फळे,भाज्या,मांस,दुग्धजन्य पदार्थ ,आयात-निर्यात करण्यासाठी होतो.
आणि  नाशवंत पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी जास्त असल्याने या प्रकारच्या कंटेनर चा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात होतो.


क्रमश :

Thursday 2 September 2010

प्रकार कंटेनर चे ................भाग ५

6) Ventilated Container :हा कंटेनर साध्या कंटेनर सारखाच दिसतो पण फरक हा आहे की याला हवा खेळती राहण्यासाठी झरोके असतात.मुख्यत्वे करून कॉफी च्या बिया आयात -निर्यात करण्यासाठी याचा उपयोग होतो.म्हणून याला कॉफी कंटेनर असेही म्हणतात.
कंटेनर च्या बाहेरील बाजूने असे झरोके असतात.
जिथे बाणाने दर्शवले आहे त्या भागात झरोके असतात..
वरील बाजूचे झरोके या प्रकारचे असतात.
आणि खालच्या बाजूने या प्रकारे झरोके असतात.

Wednesday 1 September 2010

प्रकार कंटेनर चे..............भाग ४

४)Flatrack: नेहेमीच्या कंटेनर पेक्षा हा वेगळा आहे.कंटेनर प्रकारात मोडत असला तरी वेगळ्या प्रकारचा हा कंटेनर असून ह्यात फक्त दोन बाजूनी बंद असतो.floor आणि दोन side wall चा मिळून हा कंटेनर बनलेला आहे.आणि एकावर एक कार्गो व्यवस्थित बांधून ठेवता यावा यासाठी व्यवस्था केलेली असते.२० आणि ४० फुट या दोन्ही प्रकारात flatrack कंटेनर उपलब्ध आहे.
साधारण या प्रकारचा हा कंटेनर असतो.
 या मध्ये कार्गो बांधण्यासाठी खाचा आणि हुक उपलब्ध आहेत.त्याच्या सहाय्याने कार्गो व्यवस्थित रचून बांधला जातो.या खाचा वरील फोटो मध्ये व्यवस्थित दिसून येत आहेत.
हा कंटेनर अवजड,आकाराने मोठा,असा कार्गो वाहून नेऊ शकतो.कारण असा कार्गो सध्या कंटेनर मध्ये बसू शकत नाही.आणि सध्या कंटेनर मध्ये टाकल्यात कार्गो खराब होऊ शकतो.

५)Platforms :Flatrack कंटेनर सारखाच असतो फक्त त्याला sidewall नसतात.ह्या sidewall दुमडता येण्याजोग्या आणि काढून ठेवता येण्याजोग्या असतात.
अतिशय अवजड कार्गो यावरून वाहून नेता येतो.बेढब आकाराचा कार्गो यावर व्यवस्थित बसू शकतो.उ दा मशिनरी !

सतत प्रवाही  सागराच्या पाण्यामुळे सुद्धा जहाजावर अतिशय अवजड आणि विमानाने सुद्धा न घेऊन जाता येणारा कार्गो flatrack आणि platform च्या सहाय्याने अगदी सहज वाहून नेता येतो."imported  machinery " हे शब्द नेहेमीच आपल्या वाचनात,बोलण्यात येतात.पण ही "imported  machinery "येते कशी हे मला या क्षेत्रामुळे कळलं!!!!आणि तुम्हाला?????

Monday 30 August 2010

प्रकार कंटेनर चे .........भाग ३

४) open top container : hard top container  प्रमाणेच हा पुढचा प्रकार.फरक इतकाच की छताची बाजू ही स्टील ची नसते. ती ताडपत्रीने झाकलेली असते.त्याचा हेतू एवढच असतो की सूर्यप्रकाश थोड्या-फार प्रमाणात आत यावा आणि दमात हवामानामुळे आतील कार्गो खराब होऊ नये.नाशवंत कार्गो साठी याचा उपयोग होतो.उदा.कांदा,लसूण वगैरे.
हा कंटेनर अश्या प्रकारचा असतो.
या कंटेनर चे जास्तीत जास्त वजन हे २४००० किलो २० फुटी साठी आणि ३०४८० किलो ४० फुटीसाठी ठरवलेले आहे.रिकाम्या कंटेनर चे वजन १८०० ते २४०० किलो २० फुटी चे आणि २८०० ते ४००० आणि ३९०० ते ४२०० किलो असते.म्हणजेच २० फुटी कंटेनर मध्ये २१६०० ते २२२०० किलो पर्यंत कार्गो भरता येतो.आणि ४० फुटी मध्ये २६२८० ते २७६८० किलो कार्गो भरता येतो.यावर जर त्याचे वजन गेले तर तो कंटेनर बाद ठरवण्यात येतो.
क्रमश :

प्रकार कंटेनर चे ...........भाग २

सुरुवातीला साधे कंटेनर प्रकार पाहिले.ज्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो.आता त्या पुढचे जरा सुधारित प्रकार पण आहेत.
३) hard top container :हा दिसायला जरी पहिल्या कंटेनर सारखा असला तरी यात फरक आहे.साध्या कंटेनर चे दार समोरून उघडता येते तसे या प्रकारच्या कंटेनर मध्ये समोरून आणि वरून हा कंटेनर उघडता येतो.कार्गो जर जास्त उंच (overheight  cargo )असेल तर हा कंटेनर वरून उघडा ही ठेऊ शकतो.आणि क्रेन च्या सहाय्याने हा कंटेनर भारता येतो.
पुढील छायाचित्रातून या कंटेनर ची कल्पना येईल.

Saturday 28 August 2010

प्रकार कंटेनर चे ....भाग १

कंटेनर म्हणजे काय हे तुम्हाला समजल असेलच.आता त्यातही प्रकार असतातच.अश्या या कंटेनर चे १० प्रकार आहेत.
१)standard container :हा सगळ्यात पहिला प्रकार आहे.general purpose साठी याचा उपयोग होतो.२० फुट मध्ये हे कंटेनर असतात.
याला दोन बाजूने दार असतात.याचा नंबर दारावर लावलेला असतो.कंटेनर भरल्यावर बंद केल्यावर एक कुलूप लावण्यात येते.त्याला सील म्हणतात.ते सील या प्रकारचे असते.

या सील वर एक नंबर लिहिलेला असतो.कंटेनर नंबर आणि सील नंबर ला खूप महत्व असते.
 इथे सहज कळेल कि सील कुठे लावतात ते!सरकारी अधिकाऱ्याच्या देखरेखी खाली हे सील लावले जाते.
२) high cube container :हे थोडे लांबीला मोठे असतात.आणि ४० फुटमध्ये येतात.

क्रमश: .............

Thursday 26 August 2010

क.......क........ .कंटेनर चा

आयात निर्यात क्षेत्रातली बाराखडी चालू करतीये!!आता तुम्ही म्हणाल हि पहिली -दुसरीच्या वर्गाचा  तास गेह्तीये का?पण ही सगळी क्षेत्रच अशी आहेत की बाराखडी पासून शिकावच लागतं!त्या शिवाय पुढे जाताच येत नाही !!!एम एस ची चित्रा च्या अपघात नंतर तुम्ही या कंटेनर गोष्टीशी परिचयाचे असालच.
आता कंटेनर म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एक आयताकृती डब्बा!!तो असा असतो .....
साधारण १७८० च्या आस-पास याची सुरुवात झाली. प्रामुख्याने याचा उपयोग कोळसा वाहून नेण्यासाठी केला जायचा.आणि तो ही नदी किंवा तलावात!!!यासाठी loose boxes वापरले जायचे.१८३० मध्ये छोटे कंटेनर वापरले जायचे.आताच्या तुलनेत हे कंटेनर खूपच छोटे होते.१८४० मध्ये लाकडी आणि लोखंडी कंटेनर वापरले जायचे.
१९०० च्या सुमारास चाहु बाजूनी बंद कंटेनर ची संकल्पना आली.१९२० मध्ये ५ ते १० फुटी कंटेनर यु के मध्ये रेलवे मध्ये वापरले गेले.
१९५५ मध्ये व्यावसायिक आणि ट्रक कंपनीचा मालक malcolm Mclean ने keith Tantlinger या अभियान्त्यासोबत अत्याधुनिक कंटेनर तयार केला.जो पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगा होता.त्यात मोठे आव्हान होते की त्याला बोटीवर चढवता येण्यासाठी आणि बोटीवर हलू नये यासाठी काहीतरी सुविधा हवी.त्यातून ८ फुट उंच,८ फुट रुंद आणि १० फुट लांब असा कंटेनर २५ एम एम च्या स्टील मधून तयार केला गेला.कंटेनर च्या चारी बाजूला twist lock बसवण्यात आले होते.जेणेकरून कंटेनर सोप्या पद्धतीने करेन च्या सहाय्याने हलवता येईल.इथून खरी आंतराष्ट्रीय पातळीवर सुरुवात झाली.
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने हे कंटेनर सैनिकांचे समान वाहून नेण्यासाठी केला (आता दुसरे महायुद्ध कधी झाले हा प्रश्न विचारू नका)
कोरियन युद्धाच्या वेळेस शस्त्रास्त्रे तसेच इतर संवेदनशील गोष्टी वाहून नेण्यासाठी केला गेला.पण लाकडी कंटेनर ची मोड तोड आणि चोरी होणे यामुळे आर्मी ने स्टील च्या कंटेनर ची गरज आहे हे लक्षात आणून दिले आणि तेव्हापासून हे कंटेनर चे बाळ सुधारत गेले.
आता हे कंटेनर २० फुट,४० फुट,४५ फुट,४८ फुट आणि ५३ फुट या आकारामध्ये उपलब्ध आहेत.
भारतात ७५% कंटेनर मार्फत होणारी आयात-निर्यात ही जे एन पी टी आणि चेन्नई वरून होते!!!!!
मग विचार करा जे एन पी टी मध्यंतरी  अपघातामुळे बंद होते तेव्हा केवढे नुकसान झाले असेल!!
हे कंटेनर वाहून नेणारी वेगळी जहाजे पण आहेत.त्यांना containerized ships म्हणतात.त्याची एक झलक पाहू....
आता कंटेनर चे  प्रकार पुढच्या भागात...........

Sunday 23 May 2010

प्राण्यांची शाळा

आज ३ महिन्यांनी परत आलिये इथे.वाट चुकून!लिहायचं लिहायचं करत राहूनच गेलं.वेळच मिळत नाही हो!(आता वेळ काढायचा असतो हे मीच लोकांना सांगत फिरत असते ती गोष्ट वेगळी!)असो पण आज लिहायला मुद्दाच असा मिळालाय ना की बास!माझी भाचे कंपनी!या वेळच्या सुट्टीचा दौरा माझ्याकडे होता.रोज सकाळी गजर न लावता उठायची सोय झाली होती,रोज संध्याकाळी त्यांची बडबड ऐकणे ,त्यांच्या सोबत खेळणे आणि त्यात त्यांची भांडणे सोडवणे ह उद्योग होता.दिवसभर पिडायला मी सापडलेच नव्हते.पण रविवारी तो योग आला.आणि एकूण ५ जण माझ्या राशीला लागले.सगळे साधारण वय वर्षे ३ ते १० मधले!ही सगळी वरात घेऊन कात्रज सर्पोद्यानात जायचं ठरलं.सोबत मोठी मंडळी पण होतीच.(कारण ही पिल्लावळ घेऊन मी एकटी गेले असते तर ते मलाच हरवून घरी परत आले असते!)
तिथे आम्ही एक एक प्राणी बघत होतो.तिथल्या पाट्या वाचून माहिती घेत होते.(ज्यांना वाचणं शक्य नव्हतं त्यांच्या वाचून दाखवायचं काम अर्थातच माझ होतं)आणि तिथुनच माझ्या परिक्षेला सुरुवात झाली होती!माझं बौद्धिक घ्यायला सुरुवात घरातच झाली होती.सगळ्यांचं आवरुन झालं होतं.माझी गडबड चालु होती खाणं आणि पाण्याच्या बाटल्या,डोक्याचे रुमाल वगैरे साठी!त्यात माझी भाची रुचा आली आणि म्हणाली,"अगं मावशी लवकर आवर नाहीतर ते प्राणी फिरायला जातील!"
मला काय बोलावं तेच कळेना.मी गप्प.हिला काही कळतच नाही या आविर्भावात रुचा पुन्हा म्हणाली,"अगं,आज रविवार आहे ना,मग त्याना शाळेला सुट्टी असणार ना.मग ते फिरायला नाही का जाणार?"
इतक्यात दुसरी भाची सानिका म्हणाली,"प्राण्यांची शाळा कधी असते का?"
मी गार!दोघी माझ्याकडे उत्तरच्या अपेक्षेने बघत होत्या.पण आईने खाऊ साठी बोलावलं आणि मी थोडवेळ सुटले.
तिथे पहिलाच प्राणी बघितला हरीण!आणि यांचे प्रश्न सुरु!
"हरीण झोपते कसे?"
"त्याच्या डोक्यावर शिंग कशी उगवतात?"
मी माझ्या बुद्धीच्या झेपेप्रमाणे(?) जमेल तशी उत्तरे देत होते.
मग बघितली ति निलगाय!तिला निलगाय का म्हणतात याची माहिती सुदैवाने तिथे लिहिलेली होती.पुन्हा मी सुटले.पुढे गेलो कोल्हा,लांडगा बघायला.एकतर मला त्यातला फरक अजुनही कळत नाही.त्यात एकीला ती सगळी नावं इंग्रजी मधे सांगावी लागत होती.(पुन्हा पंचाईत)
आणि तिथे गेल्यावर छोट्या भावाने "ताई,इथे कुत्री कशाला ठेवलियेत ग?"असा प्रश्न टाकला!
पुढे हत्ती बघायला गेलो.भारतीय हत्ती आणि आफ्रिकन हत्ती अश्या दोन पाट्या तिथे होत्या.आणि तिथे दोनच हत्ती होते.दोघेही भारतीय वाटत होते!(हा निष्कर्ष माझा नाही!)
"दोन्ही पण हत्ती इंडियन आहेत ना?आफ़्रिकन बरोबर त्यांचं पटत नसेल म्हणुन त्याना नाही ठेवलय ना इथे?" इति रुचा.
"हो असेल तसं!" मी
पुढे साप बघायला गेलो!सापाला दोघीजणी घाबरत असल्याने जास्त प्रश्न आले नाहीत.पण सुसर-मगर बघत असताना सानिकाचा प्रश्न,"मावशी मगरीला दात किती असतात ग?"
माझी दांडी गुल!तोंड उघडे ठेवुन झोपलेल्या मगरीचे तिने मला दात मोजायला लावले!
कुठल्याच परिक्षेत कधिही नापास न झालेली मी यात मात्र भोपळ्यापेक्षाही कमी मार्काने नापास झाले!
हे प्रश्न कसे सोडवायचे या विचारातच घरी आलो.आणि रुचाला नेमका सकाळचा प्रश्न आठवला."मावशी प्राण्यांची शाळा का नसते ग?त्यांना बोलता का येत नाही?गाण्यातले प्राणी-पक्षी कसे बोलतात?प्राण्यांचा डॉक्टर असतो तर टिचर का नाही?"
मला तरी अजुन या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहियेत.तुमच्या कोणाकडे असतील तर मला नक्की सांगा हं!!!!!

Sunday 28 February 2010

पारादीप पोर्ट

हुश्श .....शेवटी शेवटाकड़े पोहोचले.....ह्या नंतर अजुन एक आहे,,,,,,,,पण  वाटत नव्हत येइन अस.......पण आले.....ही तर फक्त माझ्या क्षेत्रा विषयी सुरुवातीची माहिती आहे.अजुन लिहाव अस बरच काही आहे......पुढे ते लिहायचा प्रयत्न करेनच..........असो
पारादीप पोर्ट हे ओरिसा मधले मुख्य पोर्ट आहे.तसच ते महानदी आणि बंगाल च्या उपसगाराला जोड़ते.ओरिसाचे मुख्यमत्री बीजू पटनाइक यानि १९५० मध्ये सुधारणा करायला घेतली.ते प्रसिद्द पायलट आणि स्वातंत्र्य सैनिक होते.
नेहेरुनी १९६२ मधे पाया भरणी चा पहिला दगड घातला.(foundation stone ) १९६६ साली हे पोर्ट व्यापारासाठी खुले करण्यात आले.पूर्वेकडचे पहिले स्वतंत्र पोर्ट.जस जशी ओरिसची प्रगती होत गेली तस-तसे हे पोर्ट पण परिपूर्ण होत गेले.
या पोर्ट ला ७ बर्थ आहेत.ब्रेक बल्क बर्थ सुद्धा आहे (ब्रेक बल्कची माहिती पुढच्या पोस्ट मधे येईलच )शिवाय ठराविक संख्येने कंटेनर लोड-अनलोड करण्याची  क्षमता आहे.
सगळ्यात मोठे असे मरीन फिशिंग पोर्ट आहे.१५० हजार स्केअर मीटर चे ओपन स्टाक यार्ड आहे तसेच ६८ जल पदार्थ साठ वाण्याची क्षमता आहे.
मुख्य आयात-निर्यात लोखंड,खते,कोलसा,स्टील,धान्य,तसेच पेट्रोलियम पदार्थ ........
पोर्ट ची साधारण रचना पुढील प्रमाणे .......
    

Saturday 20 February 2010

मोरमुगाव(mormugao )पोर्ट

चला आतापर्यंत तरी इतक्या पोर्ट ची माहिती लिहायला बरयापैकी जमलेली आहे.आता उरलेत फक्त २ पोर्ट एक म्हणजे मोरमुगाव (मोरमुगाओ)पोर्ट आणि पारादीप पोर्ट
त्यापैकी मोरमुगाव पोर्ट बद्दल थोड जुनच पण आपल्या माहिती मधे नसलेल
.............
पणजी पासून ३४ किमी वर असलेले गोव्यातील एक महत्वाचे पोर्ट.वास्को द गामा पासून ४ किमी वर आहे.चित्रकाराने एखादे सुंदर चित्र रेखाटले आहे  असे हे पोर्ट बघितले की वाटते.पोर्तुगीज याचे राजधानी चे शहर होते.ब्रिटिशांचे मुख्य व्यापाराचे केंद्र होते.१६२४ मधे बीजापुर सुल्तान आणि डच यानि हल्ले केले पोर्तुगिजानी हे हल्ले मोडून काढले.१६८३ मधे मराठयानी हल्ला केला .गोव्याची नासधूस झाली .या मुले पोर्ट चे महत्वा कमी झाले.पोर्तुगिजानी राजधानी पंजिम (आताचे पणजी) येथे हलवली.१७ व्या शतकात इथे महल बांधायला सुरुवात झाली.दुसरया जागतिक महायुद्धात याच महालात भ्रितिशानी तळ ठोकला आणि या पोर्ट वर येणारी जर्मन जहाजे उध्वस्थ केली.
१८८८ मधे हे पोर्ट अधिकृत करण्यात आले.त्या वेलेला फक्र ३ बर्थ होते.पण जसजश्या या परिसरात खाणी वाढत गेल्या तसतसा या पोर्ट चा विस्तार होऊ लागला.१९२२ मधे १२ बर्थ बांधले गेले .ख़ास करून कच्चे लोखंड (iron ore ) च्या व्यापारासाठी एक बर्थ दल गेला.दुसरया जागतिक महायुद्धानंतर जपान च्या नविन बांधणित या पोर्ट चा महत्वाचा वाटा होता.लोखंडाच्या निर्यातित ब्राझिल आणि ऑस्ट्रेलिया करून बरीच मोठी टक्कर होती त्यामुले अधिक-अधिक प्रगती करण्यात आली.२० व्या शतकात याची क्षमता वाढली.
या पोर्ट वरुन जपान,चाइना ,कोरिया आणि यूरोप ला निर्यात होते.
मुख्य निर्यात फ्रोजेन फिश,zinc oxcide ,ग्लास फायबर .
मुख्य आयात :POL crude ,सीमेंट .
या पोर्ट चा शेवटचा पण महत्वाचा भाग म्हणजे इथे जहाजाची दुरुस्ती होते,तसेच जुने,कामातून गेलेले भाग बदलणे,स्वच्छता ,रंग देणे आदि ची ही सुविधा आहे.आशय सुविधा ठराविक पोर्ट वरच उपलब्ध असतात.


(या पोर्ट चे चित्र मला मिळू शकलेले नाहीये.जेव्हा मिळेल तेव्हा टाकेनच)
ता क काही शब्द मराठी मधे टाकता आलेले नाहीयेत.मराठी शब्द मला माहित नाहीत म्हणून.
 

Sunday 14 February 2010

मंगलोर पोर्ट

मंगलोर पोर्ट हे कर्णाटक मधले महत्वाचे पोर्ट असून याची माहिती पुराण काळात पण सापडते.श्रीराम-रामायण ,पांडव ,सहदेव-महाभारत,अर्जुन,कृष्ण -भगवतगीता मधले बरेच प्रसंग इथे घडून गेलेले आहेत.
१५०० पासून १७६२ इथे पोर्तुगिजांच राज्य होते.१७६२ मधे म्हैसूर चा राजा हैदर अली ने यावर कब्ज़ा केला आणि १९६७ पर्यंत राज्य केले.१७६७ मधे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यात १७८३ पर्यंत होते नंतर हैदर अलिचा मुलगा टीपू सुलातानाने परत स्वताच्या ताब्यात घेतले.
दुसरया अंगालो-म्हैसूर युद्धात टीपू सुल्तान अह्राला आणि परत हे पोर्ट ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.ता कालावधीत शिक्षण आणि उद्योग मधे समृद्ध झाले आणि महत्वाचे व्यापाराचे केंद्र बनले.२० व्या शतकात वाणिज्य,व्यापार आणि माहिती तंत्र चे मुख्य केंद्र बनले.जहाज बांधणी आणि मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय.नंतर त्यात कॉफ़ी,काजू,कापूस यांची भर पडली.जुन्या पोर्ट वरुन या गोष्टी मुख्यत्वे आयात-निर्यात होत होत्या.
१९७५ मधे इंदिरा गांधी यांनी नविन पोर्ट चे उद्घाटन केले तेव्हा ९ वे मुख्य पोर्ट होते.१९८० पर्यंत ते केंद्र सरकारच्या देखरेखीखाली होते.नंतर ते पोर्ट ट्रस्ट बोर्ड च्या तबय्त देण्यात आले.तेव्हा त्याची कामगिरी घसरली.१० व्या क्रमांकावर आले.
येथून होणारी निर्यात म्हणजे लोखंड,पेट्रोलियम ,तेल ,ग्रानाइट आणि कंटेनर मधून जाणारा माल.
येथून होणारी आयात म्हणजे लाकडाचा लगदा.लिक्विड अमोनिया ,खाते,फोस्फोटिक आम्ल वगैरे.
एकूण १२ बर्थ आहेत.त्यातील ४ बर्थ फक्त POL (पेट्रोलियम,ऑइल आणि लुब्रीकंट) साठीच वापरले जातात
नविन पोर्ट ची रचना साधारण पणे अशी आहे

 

Thursday 4 February 2010

कोची/कोचीन पोर्ट

कोची किंवा कोचीन पोर्ट दक्षिण भारतात वसलेले आहे.हे पोर्ट नैसर्गिक असून सगळ्या प्रकारच्या वातावरण मधे उपयोगी येऊ शकते.congestion फ्री म्हणजेच जिथे जहाजांची सहसा गर्दी होत नाही.असे हे पोर्ट आहे.
१२ शतकाच्या आधीपासून मसाल्याच्या व्यापारामधे व्यस्त आहे.१२ व्या शतकापासून या पोर्ट चे महत्व वाढले  जसे १३४१ मधे "कोडून गल्लुर  पोर्ट" चक्री वादळ आल्यामुले पूर्णपणे कोलमडले.
१५०३ ते १६६३ मधे पोर्तुगल यांच्या ताब्यात कोची पोर्ट होते.
१८०० शतकाच्या शेवटी मालाची वाहतुक वाढली.मद्रास सरकार ने रोबेर्ट ब्रिस्टो नावाच्या अभियांत्याला हे पोर्ट नव्याने टायर करण्यासाठी बोलावले होते.त्याने २० वर्षात सगळ्यात सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीचे पोर्ट तयार केले.
स्वातंत्र्यानंतर १९९० च्या मध्य पर्यंत कोची पोर्ट ला आर्थिक फटका बसला.
२१ व्या शतकात पोर्ट ची क्षमता वाढली.नविन उपकरणे ,नविन तंत्र या मुले कोची केरळ ची व्यापाराची राजधानी झाली.तसेच भारताचे महत्वपूर्ण पोर्ट मानले जाते.
कोची पोर्ट वरुन चहा,सीफ़ूड,मसाल्याचे पदार्थ,कॉफी निर्यात होते तर खाते,बी-बियाणे आणि मशीनरी आयात केली जाते.
कोची पोर्ट ची रचना साधारण पुढील प्रमाणे आहे.
  

Wednesday 3 February 2010

कोलकता पोर्ट

कोलकता पोर्ट हे सगळ्यात जुने आणि नदी जवळ  वसलेले पोर्ट आहे.ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने बांधले होते.मुग़ल आणि औरंगजेब कडून व्यापाराचे हक्क मिळाले मग १८७० मध्ये बांधले गेले.दुसर्या महायुद्धात या पोर्टने महत्वाची कामगिरी बजावली.जापानी सेनेने २ दा बोम्ब स्पोट केले. १९ व्या शतकात मुख्य पोर्ट होते.पण स्वातंत्र्यानंतर या पोर्ट चे महत्व कमी झाले.त्याची प्रमुख कारणे म्हणजे बंगालची फाळणी,पोर्ट चा कमी झालेला विस्तार आणि त्यामुले खालावलेली आर्थिक स्थिती.
२१ व्या शतकात या पोर्ट चा विस्तार झाला.सर्व सोयी सुविधा मिलाल्या.त्यामुले आर्थिक प्रगती  झाली.पोर्ट वरचा कामाचा बोजा वाढला.२००४-२००५ मधे सगळ्यात वेगाने प्रगती करणारे म्हणून हे पोर्ट मानले जाते.
भारतातले दुसरे कंटेनर पोर्ट म्हणून ओळखले जाते.
कोलकता पोर्ट आणि हल्दिया डॉक एकत्र पणे येथे कार्यरत आहेत.कोलकता पोर्ट ला किद्देरपोर डॉक ला १८ बर्थ आहेत,नेताजी सुभास डॉक ला १० बर्थ आहेत आणि ६ पेट्रोलियम व्हार्फ़ आहेत.

हल्दिया पोर्ट ला १२ बर्थ आहेत तसेच ३ ऑइल जेट्टी असून ३ बार्ज(खोलगट आकाराची बोट ) आहेत.
पुढील चित्रात बार्ज आणि टगबोट (बार्ज ला ओढून नेणारी बोट )

कोलकता पोर्ट ची रचना 


कोलकता पोर्ट वरुन मुख्यत्वे साखर ,तांदुळ ,लोखंड, स्टील,मशीनरी ,एलपीजी आणि जल पदार्थ आयात केले जातात तर चहा,जुट ,गहू ,मका,वगैरे निर्यात केले जातात.  

 

Monday 1 February 2010

पायापाशी दुनिया झुकाव ........वकाव.....

पायापाशी दुनिया झुकाव ....वकाव.....एका मराठी गाण्याचे हे शब्द .........हे सामर्थ्य आहे फक्त आणि फक्त आपल्या नविन पिढीच्या मुलांमधे ............अश्याच मुलांमधे काढलेला एक दिवस..........संस्मरणीय असा कालचा रविवार ठरला.त्याच झाल अस की महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमधे दिशा डेवलपमेंट ट्रस्ट आणि रोटरी क्लब सिंहगड रोड  तर्फे आयोजित "सृजन वाग्यज्ञ २०१० " मधे जवळ जवळ १२०० शालेच्या मुला-मुलींची वक्तृत्व स्पर्धा होती.पाचवी ते दहावी च्या मुला-मुलींचा यात सहभाग होता.मी तेथे स्वयंसेवक म्हणून गेले होते.माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी ही होत्या.सकाळी ८.४५ पासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आम्ही अखंड फिरत होतो.धावपळ करत होतो.मुलाना वर्गात बसवणे, त्याना सगळ्या सूचना देणे,परिक्षकानी दिलेल्या मार्कांची बेरीज करून दुसर्या फेरिसाठी निवड,प्रत्येकाला दिल्या जाणार्या प्रशस्ति पत्रकांवर नावे घालणे आदि कामे आमच्याकडे होती.पण त्यातही खुप मजा आली.सगळ्या वयोगटाच्या मुलांसोबत गप्पा मारायला मिळाल्या.त्यांचे विचार ऐकायला मिळाले.
आपली नविन पीढ़ी काय विचार करते हे बघून आपण थकक होउन जातो.दुसर्या फेरितुं प्रत्येक इयात्तेमधाली ३ मुले आणि ३ मुली निवडल्या गेल्या.त्याना बक्षिसे "हरिशचंद्राची फक्टोरी चे दिग्दर्शक परेश मोकाशी "याच्या हस्ते देण्यात आली.ढोल-ताशाच्या गजरात हा समारंभ झाला.आणि विशेष म्हणजे प्तात्येक मुलाला प्रशस्ति पत्रक ,एक पुस्तक आणि एक रोप भेट म्हणून देण्यात आले.सुट्टीचा दिवस असून मुलांचा उत्साह प्रचंड होता.
माझ्या माहितीत अशी भव्य स्पर्धा प्रथमच घेण्यात आलीये."मराठी मागे पडलीये" जे बोलतात त्याना सांगावेसे वाटते की या आणि बघा...........
कालच्या सकाळ मधे "चला बोलूया चला ऐकुया "अशी या स्पर्धेची बातमी आलेली आहे.तुम्ही ती वाचली असेलच.
त्याची काही क्षणचित्रे ...........तुमच्यासाठी.........
  आयोजक राउत सर परिक्षकाना सूचना देताना.
उपस्थित मुले..........






परेश मोकाशी यांच्या हस्ते बक्षिस स्वीकारताना विजेते मुले......आणि विशेष म्हणजे अंध मुलानी खुल्या गटातून बक्षिसे पटका  वलियेत







मराठी पाउल पड़ते पुढे...................

Thursday 28 January 2010

मुंद्रा -कांडला पोर्ट

 कांडला पोर्ट हे तिसरे महत्वाचे पोर्ट आहे.गुजरात मधे कत्च शहरात  ब्रिटिशांच्या कळत बांधले गेले आहे.महाराव श्री खेंगार्जी ३ रे आणि ब्रिटिश सरकार ने मिळून १९ व्य शतकात याची उबह्रानी केली.१९३१ मधे हे पोर्ट चालू केले.नंतर फाळणी मुले कराची पोर्ट पाकिस्तान मधे गेले आणि कांडला पोर्ट ने भारताच्या सागरी वाहतुकीमधे मोलाची भर घातली. सध्या हे पोर्ट मिनिस्ट्री ऑफ़ कॉमर्स च्या अख्त्यायारित आहे.


कांडला पोर्ट हे सर्व सोयीनी सुसज्ज आहे.१० बर्थ पॉइंट आहेत,६ ऑइल जेट्टी (असे यन्त्र ज्यातून ऑइल जहाजातुन काढले आणि जहाजात भरले जाते ),

१ देखभाल करणारी जेट्टी ,एक ड्राय डॉक (तिथे कोरडा कार्गो ठेवला जातो) आणि काही लहान जेट्टी आहेत.या टर्मिनल आणि जेट्टी शेजारी कोरडा कार्गो तसेच ऑइल आणि पेट्रोलियम साठवले जाते.




तसेच या पोर्ट ला १६ व्हार्फ़ क्रेन्स आहेत.(पुढील चित्र)

याशिवाय मध्यवर्ती ठिकाण असल्याने उत्तर,पश्चिम आणि मध्य भारताला जोडणारे आहे.शिवाय कांडला हे फ्री ट्रेड झोन च्या खाली येते.असे हे भारतातले पहिले पोर्ट आहे.खाद्य पदार्थ आणि ऑइल ची आयात या पोर्ट वरुन सगळ्यात जास्त होते.








१९९८ मधे मुंद्रा पोर्ट बांधले गेले.स्पेशल इकोनोमिक झोन मधे बांधले गेलेल हे पोर्ट आहे.या पोर्ट वरुन मुख्यत्वे यूरोप ,आफ्रिका अमेरिका आणि मिडल इस्ट ला जहाज वाहतुक करतात.या पोर्ट ला ८ बर्थ आणि ४ कंटेनर बर्थ आहेत.नविन असेल तरी राजस्थान ,हरियाणा,पंजाब,दिल्ली ,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,हिमाचल,उत्तरखंड आणि जम्मू आणि कश्मीर ला जोडणारे आहे.सर्व आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असून रस्ता,रेलवे आणि हवाई वाहतुक सुद्धा सहज उपलब्ध आहे.या पोर्ट चे अजुनही काम चालू असून नजीकच्या काळात आयात निर्यात क्षेत्रात याचे योगदान निश्चितच वाढणार आहे.

Tuesday 26 January 2010

चेन्नई पोर्ट

मुंबई /न्हावा शेवा पाठोपाठ चेन्नई पोर्ट चा दूसरा क्रमांक लागतो .चेन्नई हे भारतातले दुसरे मोठे पोर्ट आहे.पश्चिम भारतात मुंबई जसे आयात-निर्यात क्षेत्रात मोठा हातभार लावते तसेच दक्षिण भारतात चेन्नई पोर्ट कार्यरत आहे.या पोर्ट ला १२५ वर्ष पूर्ण झालेली आहेत. आयात-निर्यती साठी उपयोगात येण्या आधी हे पोर्ट पर्यटन साठी उपयोगात होते.हे मानवनिर्मित पोर्ट आहे.१८६१ मधे याची बांधणी झाली होती  परन्तु १८६८ आणि १८७२ मधल्या वादळ मुले याची वाताहत झाली १८७६ मधे एल आकाराचे breakwater अर्थात बांध घालायला सुरुवात केली पण पुन्हा १८८१ च्या वदालत पूर्ण बन्दर उध्वस्थ झाले.चेन्नई पोर्ट ट्रस्ट ने पुन्हा नव्या उमेदीने १८८१ मधे उभारलेले हे पोर्ट मोठ्या दिमाखात १२५ वर्ष पूर्ण करत आहे.
निशंक पणे या शहराची वाढ या पोर्ट मुले लवकर झाली .औद्योगिक विकास ही झपाट्याने झाला.

चेन्नई पोर्ट ला ३ डॉक आहेत डॉ.आंबेडकर डॉक ,सताब्त जवाहर डॉक आणि भारती डॉक.चेन्नई चे कंटेनर टर्मिनल सुद्धा दुबई पोर्ट वर्ल्ड मार्फ़त चालवले जाते.
चेन्नई वरुन आयातित मुख्यत्वे लोखंड,कोलसा,पेट्रोलियम प्रोदुक्ट्स आणि जनरल कार्गो हाताळला जातो.निर्यात मधे शेंगदाने व त्यासह तेल,चहा ,कांदा याचा समावेश होतो.चेन्नई  वरुन मुख्यत्वे सिंगापूर ,मलेशिया ,थायलंड ,म्यानमार,श्रीलंका ,कोरिया ,चाइना ,मेडिटेरियन,यूरोप ऑस्ट्रेलिया ,यूएस ला सर्विस देतात.
या पोर्ट ला एकून २१ बर्थ पॉइंट (जिथे जहाज लगते )असून त्यातले ३ पॉइंट भारतीय नौ सेनेला देण्यात आले आहेत.  
चेन्नई नंतर नम्बर लागतो तो मुंद्रा-कांडला पोर्ट चा.त्याबद्दल पुढच्या पोस्ट मधे.

Sunday 24 January 2010

मुंबई /न्हावा शेवा पोर्ट

भारतातील १२ पोर्ट पैकी प्रमुख आणि महत्वाचे पोर्ट म्हणजे मुंबई पोर्ट.मुंबई बद्दल वेगले काही बोलायला नकोच.
मुंबई बंदरला नुकतीच १३५ वर्षे पूर्ण झालीयेत.भारतामधे असणार सगळ्यात जुनबन्दर म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट.जून २६,१८७३ मधे ते "बॉम्बे पोर्ट ट्रस्ट" या नावाने स्थापन  झाले."प्रिंसिपल गेटवे ऑफ़ इंडिया "असे त्याला संबोधले जाते.निसर्गदत्त खोल पाण्याची देणगी या बंदरला मिळालेली आहे.४०० स्केअर किलोमीटर च कोकणाने वेढलेला किनारा लाभल्यामुले निसर्गदत्त देणगी मिळालेले बन्दर जगातील अनेक बंदरापैकी एक मानले जाते.मुंबई पोर्ट ला ३ डॉकयार्ड आहेत.डॉकयार्ड म्हणजे जिथून जहाजावर माल भरला-उतरवला जातो.इंदिरा  डॉक ,प्रिंस डॉक आणि विक्टोरिया डॉक अशी त्यांची नवे आहेत. त्यापैकी इंदिरा डॉक १९१४ मधे चालू झाले.प्रिंस डॉक १८८० मधे तर विक्टोरिया डॉक १८८८ मधे बांधले गेले.


वरच्या चित्रमधुन डॉक यार्ड कसे असते याची कल्पना येइल.
मुंबई पोर्ट सगळ्यात जुने आहे.पण भारताचा जसा जसा विकास होत गेला,आयात निर्यात वाढली तस तसे या पोर्ट वर ताणपडू लागला.आणि एका नव्या पोर्ट ची गरज भासु लागली.आणि त्यातूनच जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ची स्थापना झाली.भारतातले मोठे बन्दर म्हणून याची गणना होते.देशाचा ५०% वाहतुकीची वर्दळ या पोर्ट मधून चालते.मे २६,१९८९ मधे याची स्थापना झाली.यामधे ३ टर्मिनल्स आहेत जेएनपीटी(जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ),जीटीआय(गेटवे टर्मिनल ऑफ़ इंडिया ),एनएसआयसीटी( न्हावा शेवा इंटरनेशनल कंटेनर टर्मिनल )   जेएनपीटी आणि जीटीआय ही दोन्ही भारत सरकार तर्फे चालतात तर एनएसआयसीटी हे दुबई पोर्ट्स वर्ल्ड यांच्या मार्फ़त चालते .हे पहिले खाजगी कंपनी ने चालवलेले कंटेनर टर्मिनल आहे.
येथून होणारी निर्यात  म्हणजे कॉटन शर्ट,टी-शर्ट ,खेलाचेसाहित्य कारपेट,मेडिकल साहित्य इत्यादि
आणि आयात म्हणजे रसायने,यंत्र,आणि धातु.



पोर्ट चा लेआउट साधरण पणे असा आहे.
  भारतातील सगळ्यात मोठे आणि पहिले पोर्ट जे ब्रिटिश असताना बांधले गेले त्याची ही थोडक्यात माहिती .भारतातील दुसरे मोठे पोर्ट म्हणजे चेन्नई .त्याची माहिती पुढच्या पोस्ट मधे !!!!!!!!!

Monday 18 January 2010

माझे "आंतरराष्ट्रीय व्यापार " विश्व

खरतर आंतर राष्ट्रीय व्यापार हे क्षेत्र तस खुपच मोठ .पण काहीतरी नविन आणि हटके शिकयाच्या उद्देशाने मी या क्षेत्रात आले .खुप काही नविन माहिती मिळाली.अर्थ व्यवस्था मधला हा एक हिस्सा.आयत-निर्यात क्षेत्र .त्याबद्दल माझ्याकडे जी माहिती आहे ती यथाशक्ति तुम्हाला सांगणार आहे.ही माहिती तशी खुप रस घेण्यासारखी आहे  !!!रोज काहीतरी नविन माहिती देण्याचा विचार आहे.!पण बघुयात कसा जमतय ते!!!!!!
कोणताही देश स्वयंपूर्ण नाही .एखादी गोष्ट त्या देशाकडे उपलब्ध नसेल तर ती दुसर्या देशाकडून आयात करण्या वाचून पर्याय नसतो.आणि जय देशाकडे एखादी गोष्ट मुबलक असते ती त्याना सहजपणे गरजू देशाना निर्यात करता येते.या आयात-निर्यात मधुनच आंतर राष्ट्रीय व्यापाराची संकल्पना पुढे आली.पूर्वीच्या पद्धतीत आणि आताच्या पद्धतीत खुप फरक आहे.सध्या चालू असलेला व्यापार हा जलमार्गाने आणि वायुमार्गाने चालतो.पण वायुमार्गावर बंधने आहेत.त्यापेक्षा जलमार्ग सुलभ आणि सोपा पडतो.

भारताला ७६०० किलोमीटर चे बन्दर लाभले आहे.त्याला जगातील सगळ्यात मोठे peninsulas आहे.याचा अर्थ पाण्याने तीन बाजूने वेढ़लेली जमीन पण ती मुख्या जमिनीशी जोडलेली आहे.भारताचा नकाशा बघितला की सहजपणे हे लक्षात येते.

भारतात प्रामुख्याने १२ मोठी बंदरे(seaport )आहेत.आणि इतर १८५ छोट्या बन्दारामार्फत अंतर्गत व्यापार चालतो .प्रमुख बंदरामधे न्हावा शेवा,चेन्नई ,मुंद्रा वगैरे बंदराचा समावेश होतो.पुढच्या नकाशात ती प्रमुख बार बंदरे सहजपणे लक्षात येतात.


या सर्व बंदराची माहिती पुढच्या लेखात...............

Saturday 16 January 2010

बस चुकली !पण कोणाची ???

बसचा प्रवास म्हणजे एक दिव्य असते .हे दिव्य गेले कित्येक वर्ष मी करतिये .बस चुकली तर काय होत माहित असेलच तुम्हाला पण ती जर बसच्या कंडक्टर ची चुकली तर ?????तिच एक मजा अशी  .
संध्याकाळी ६ ची वेळ .बस अगदी गच्च भरलेली .मुंगी शिरायला पण जागा नव्हती .चालक नेहेमी प्रमाणे बेल वाजल्यावर निघाला .स्वारगेट वरुन बस जेमतेम लक्ष्मी नारायण चौकात पोहोचली .बस मधे कोणीतरी अचानक ओरडल "बस थाम्बावा कोणीतरी बस पकडायला पळत येतय!" आम्ही सगळे विचार करत होतो की कोणाला अवधी घाई आहे जो रस्त्यातून पळत येतय .तेवढ्यात ती व्यक्ति अवतरली
आणि अहो आश्चर्यम बस च वाहक (कंडक्टर ) होता !!!!!
आम्ही हसून हसून वेडे झालो .तो चढला आणि धापा टाकत चालकाला म्हणाला "मी आल्याशिवाय तू बस सोडली कशी ?"
चालक म्हणाला "अरे बेल वाजली मला वाटल तूच दिलीस आणि गर्दी मुले दिसला नाहीस म्हणून निघालो !"
वास्तविक शेवटचा स्टॉप असल्याने तो रिपोर्ट करायला खाली उतरला आणि गर्दीत कोणाच्या तरी हातून बेल वाजली .आणि गर्दी मुले पुढच्या लोकाना वाटल वाहक मागे आहे आणि मागच्या लोकाना वाटल तो पुढे आहे !!!!!!!
तेव्हापासून तो सगळ्यात आधी बस मधे चढतो रिपोर्ट करून, मग लोकाना घेतो !!!!!!!!

Friday 15 January 2010

तरुण तुर्क म्हातारे अर्क आणि लहान मुले ?

तरुण तुर्क म्हातारे अर्क हे गाजलेल नाटक जुने नाटक .ते नाटक रंगभूमीवर आल तेव्हा मी बहुतेक या जगात आलेच नव्हते .एक अप्रतिम कलाकृती बघायची राहून गेलीये.पण त्याची भरपाई म्हणून सीडी आणून त्याची पारायण केली.नुकतीच माझी भाची रुचा(वयवर्ष ७-८ ) येउन गेली.काहीतरी बघायचे करून संगणक लावून बसली आता तिला दाखवायचे काय असा प्रश्न होताच .सहज तरुण तुर्क च्या फोल्डर वर नजर केली आणि ते नाटक चालू केल.तिच्या वयाला ते झेपणार नाही आणि तीच बंद कर म्हणेल या अपेक्षेने लावले .पण तिनेच माझी विकेट काढली .संपूर्ण नाटक बघितल आणि तिची प्रश्न पेढ़ी चालू झाली .तिला मी हे नाटक का दाखवल ह्या प्रश्नाच उत्तर मी अजुन शोधतिये.तिचे नाटक दरम्यान प्रश्न असे होते की विचारायला नको .
नाटकामधला  प्रसंग एक बंड्या (सुनील तावडे ) आणि प्यारया (राजन पाटिल )हे रूम चे सिनिअर .नुकत्याच एफवाय ला आलेल्या कुंदा (अतुल परचुरे )चे वस्त्रहरण करत असतात .
रुचाची गुगली "मावशी ते काय करतायत ?"
"अग ते न त्याला त्रास देतायत " इति मी .
"म्हणजे ते रागिंग करतायत ना?"
मी गार !!!!!(तिने ३ idiot बघितलेला आहे )
पुन्हा प्रश्न "मग त्याने मोठ्या प्यांट खाली हाल्फ प्यांट का घातली आहे?त्या ३ idiot सारखी चड्डी का घातली नाहीये ?"
माझ्याकडे उत्तर नाही .मी गप्प!!!आता तिला मी काय सांगणार ?तिच्या या का च उत्तर कोणाकडे मिळणार ?पण तिच "सांग ना !" चालू होत
"बाबाना विचार " इति मी
सुदैवाने तिचे बाबा आले नव्हते पण घरी जावून तिने विचारलेच आणि मी शिव्या खाल्ल्या
प्रसंग दोन प्यारया च एक वाक्य "थर्ड पर्सन सिंग्युलर साला !"
"मावशी तो खरच थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का ग?"इति रुचा (ती कॉन्वेंट मधे शिकातिये त्यामुले इंग्लिश ग्रामर छान मावशीच इंग्लिश म्हणजे आइ ऍम द गर्ल च्या लेवल च )
मी नुसतीच नाही या अर्थाने मान हलवली .ती जरा गप्प .मावशीनेएक तरी उत्तर दिल म्हणून खुश .पण तिला काय माहित की मावशिलाच "थर्ड पर्सन सिंग्युलर" नीटस नाहीये  !!!!!
प्रसंग तीन धमी (संज्योत हर्डीकर )म्हणते "सर,ह्या बंड्या न त्यान ना ही किसड मी !!"
"तो किस दाखवला कुठे ?" रुचा
"अग ते लपले होते ना म्हणून आपल्याला दिसल नाही  "मी सांगायचा एक प्रयत्न केला
"मग त्यानी बाहेर येउन का नाही केला?३ idiots मधे दाखवला ना!"
आता चक्कर येउन पडायची माझी वेळ होती !!!!!!
सुदैवाने माझ्या मैत्रिणी अवतरल्या आणि माझी सुटका झाली (तात्पुरती )
नाटक संपल्यावर ती लगेच घरी गेल्याने मी वाचले पण आगामी प्रश्नांच काय ??????

कोणाकडे वरच्या प्रश्नांची उत्तरे तर मला सांगा ह...............

Wednesday 13 January 2010

तीळ आणि गुळ

एकदा एका बोक्याने ढकलले गुळ ला
त्यात वरुन पाडले तीळ ला
तीळ चिकटला गुळ ला
आणि लागला रडायला
म्हणाला "आता आपण चिकटलो
बिन कामाचेच झालो
आता आपल्याशी कोणीच बोलणार नाही,
आणि आपण कोणालाच आवडणार नाही !"
आवाज ऐकून छोटी ताई आली धावत
आणि तिला पाहून बोका सुटला  पळत
उचलले तिने अलगत दोघाना
"रडू नका रे" म्हणाली त्याना
तुम्ही दोघे एकत्र सर्वाना आवडाल
एक मोठा आनंद दयाल
"तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला
सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका "
सगलेच खुश होउन तुम्हाला देतील-घेतील
मकर संक्रांतिचा आनंद लुटतील
तुमच्याशिवाय संक्रात होणार नाही साजरी
 तुम्ही लावाल दरवर्षी हजेरी
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा सर्वाना देवुया
आणि या सणाचा आनंद लुटुया!!!!!!


ता क :कुठूनही साभार परत न आलेली एक बाल कल्पना !!!!!!!

Monday 11 January 2010

झोपेची आराधना कुठेही आणि कधीही (?)

एक जिव्हाळ्याचा विषय !!!!!झोप !!!!!
मला अजुनही अस एक महाभाग भेटला नाही की ज्याला झोपायला आवडत नाही.पु.लं.नी त्यांच्या "म्हैस " मधे झोपेचे वर्णन अप्रतिम केलय."कुणी झोप चाखत होते ,कुणी गिळत होते " अशी शब्द रचना फक्त तेच करू शकतात .मी बघितलेले झोपेचे प्रकार जरा चमत्कारिक आहेत.कारण हे प्रकार मी लग्नात,बसमधे ,एस टी मधे ,रेल वे मधे ,शाळेत ,कॉलेज मधे बघितलेले आहेत .आणि विशेष असे की कोणताही प्रकार एक सारखा नाही .
लग्नामधे सगळ्यात बोरिंग प्रकार म्हणजे विधी!एकतर त्यासाठी फक्त मुलगा-मुलगी-त्यांचे आई-वडिल या लोकांसाठीच असतो .बाकीचे नातेवाइक नावापुरते असतात .त्यातल्या त्यात बायकांना मिरवा-मिरवी करता येते.लहान मुले मोकाट सुटलेली असतात .प्रश्न असतो तो पुरुष मंडळीचा .सकाळी लवकर उठून अंघोळ-चहा-नाश्ता करून चांगले कपडे घालून फक्त दुपारच्या जेवणाची वाट बघायची असते .चार-पाच मंडळी जमून गप्पा चालू असतात .नंतर जस-जसा वेळ पुढे सरकतो या मंडळीच्या गप्पा ओसरतात .मग कोणी खुर्चीवर बसल्या बसल्या पेंगतात.मानेचे झोके जात असतात मधेच खडबडून जागे होतात स्वत: कुठे आहोत याची आधी खात्री करून घेतात .अंदाज आला की पुन्हा निद्रादेवी च्या स्वाधीन होतात.कोणी लहान मुलांना झोपवता झोपवता स्वत :ताणून देतात.कुणी चक्क घोरत पडतात.
बस आणि एस टी मधे झोपायचे प्रकार पण अजब आहेत .कोणी पुस्तक वाचता वाचता झोपतो कुणी कानात हेडफोन घालून झोपतो .आणि ज्यांच्या नाकावर चश्मा असतो तो जागा आहे की झोपलेला तेच कळत नाही.एकतर बस-एस टी च्या वेगाने सगळेच हालत असतात तय मुले जाणारे झोके वेगाने आहेत की झोपेचे ते कळत नाही.कधी-कधी दुसर्याच्या खांद्यावर डोक टाकुन झोपतात.तो प्रसंग पण मस्त असतो .शेजारी जर बाई असेल तर ती अशी शंकेने बघत असते .शेजारच्या आपल्या अंगावर पडणार नाही या साठी कसरत करत असते.पुरुष मंडळी असतील तर ढकला-ढकाली चालू असते.लहान मूल ओढा-ओढ़ी करत असते.आणि झोपलेला मधेच जर जागा झाला तर खिडकितुन बाहेर बघतो इच्छित स्थळ गेले की यायचेय हे बघायला !यायचे असेल तर निवांत होतो परत डोळे मिटू लागतो आणि समजा गेले असेल तर उतरन्यासाठी धडपडत असतो .
शाळेत झोपायचे प्रकार म्हणजे एकतर वाही/पुस्तक खाली मण्डीवर ठेवून टेबल वर डोके ठेवून झोपणे.दूसरा म्हणजे टेबलवर वहीवर डोके ठेवणे आणि चेहरा दिसणार नाही अश्या पध्धातिने हात ठेवणे.अजुन एक प्रकार म्हणजे उंच लोकांच्या मागे बसणे.घोळक्यात बसणे .लिहिता लिहिता झोपण्याचा प्रकार तर प्रसिध्ध आहे ........
असे अनेक प्रकार तुम्ही बघितले असतील...........मलाही सांगाल तुंचे अनुभव????????  

ता.क. सगळे प्रकार मी स्वत :बघितलेले आहेत तरी यापैकी कोणत्याही प्रकारात तुम्ही मोडत असल्यास तो योगायोग समजावा.

Saturday 9 January 2010

बाल प्रश्न????

बाल मनाला पडणारे प्रश्न खरतर नेहेमीच कोडयात पाडणारे असतात.असे अनेक प्रश्न गेले कित्येक वर्ष मी ऐकतिये .नेहेमी प्रमाणे त्यासाठी माझ्याकडे उत्तर नाहीत.विशेष हे की असे प्रश्न कधीही केव्हाही कसेही येतात.ही प्रश्न विचारणारी मंडळी म्हणजे माझी भाचे कम्पनी .आणि आमच्या सोसायटी मधील सर्व लहान मुले.
ही पोस्ट आजच लिहायच कारण म्हणजे कालच आलेला नविन प्रश्न.सोसायटी मधल्या एकाने विचारलेला "ताई सायकल कशी चलते ग ?" ती कशी चालते हे त्याला सायकल समोर घेउन दाखवले ते त्याला पटल अस वाटेपर्यंत त्याचा दूसरा प्रश्न "मग आपण बाइक अशीच का चालवत नाही ?" मी गार !!!!! मी त्याला म्हटल "तू मोठा झालास की समजेल तुला " त्यावर त्याचा अजुन एक प्रश्न "मोठा म्हणजे तुझ्या सारखा ? मग तुला का माहित नाही ?" त्याच्या हा प्रश्नाच उत्तर मी अजुन शोधतिये!!!!
असेच अनेक प्रश्न कायम येतात त्यापैकी कही निवडक आणि निरुत्तर करणारे म्हणजे :फलांचा राजा आंबा का? तो तर केवढा लहान असतो .कलिंगड सगळ्यात मोठ मग तो का नाही ???"
सालिंदर नामक एक प्राणी पहिल्यांदा बघितलेला माझा मामेभाऊ!तो शत्रुवर काटे फेकतो वगैरे सांगुन त्याच्या माहितीत भर घालण्याचा प्रयत्न .त्यावर त्याचा प्रश्न "तो काटे कसे फेकतो ?मग ते काटे त्याला टोचत नाहीत का?मग एकदा काटे फेकले की परत कसे येतात ?"
घरोघरी चालू असलेला संवाद "पेट्रोल महान झाले आहे जास्त जालायाला नको वगैरे ?तसच आम्ही एकदा बोलत बसलो होतो मधेच माझा भाचा त्यावर म्हणाला " पेट्रोल जळत म्हणजे काय ?ते तर पाणी जसा असत तसच असत मग पाणी का जळत नाही ?पाणी तर रोज आपल्या नलाला येत मग तुम्ही गाडीत पाणी का घालत नाही "
अश्यासारखे बरेच प्रश्न माझ्यावर तूफ़ान हल्ला करत असतात .......एरवी इतराना गार करणारी मी ह्या मुलांसमोर शरणागति पत्कारते...........
हे प्रश्न तुम्हाला सुटले तर मला उत्तर नक्की सांगा.........आयुष्यात एकातरी लहान मुलाचे शंका समाधान करायची इच्छा आहे!!!!!

Monday 4 January 2010

खरा मालक कोण ?

शीर्षक पाहून घाबरू नका .कोणत्याही मालमत्ता च्या केस बद्दल बोलणार नाहीये .मालकी हक्क हे कोणत्याही गोष्टीचे असू शकतात .अगदी मालमत्तेपासून माणसापर्यंत!!!!अश्याच एक छोट्या वस्तुची मजेदार आणि कधीही न विसरता येणारी ही कथा
माझा भाचा अथर्व वय वर्ष ३-४ च्या आसपास.शालेचा  पहिलाच दिवस .मस्तपैकी तयार होउन शाळेत आलेला.नविन ड्रेस,बूट,दप्तर वगैरे घेउन.माझ्याच शाळेत म्हणजे नविन मराठीमधे त्याला घातले होते .त्यामुले सोडायला मी पण गेले होते.
पहिलाच दिवस आणि शाला फुलून गेली होती.शाळेत गेल्यावर फार छान वाटल होत.एक तास शाला होती.अथर्वचा ड्रेस नविन असल्यामुळे चड्डी(आता शालेच्या चड्डीला प्यांट म्हणन म्हणजे ........................ ) थोड़ी मोठीच होती .साधारण एक तासाने शाला सुटली.जवळच गौरी मस्तानी मधे मस्तानी खायला चाललो होतो .अथर्व सारखा चड्डी सावरत होता.वहिनीला थोड़ी शंका आली की काहीतरी घोळ आहे.अथर्व ला विचारले सुध्धा काय होतय ते पण तो काहीच बोलला नाही म्हणून आम्ही पण सोडून दिले .आणि मस्तानी खाताखाता एकदम तो म्हणाला "अग आई ही माझी चड्डी नाहीये .आम्हला शू करायला एकत्र नेल होत तेव्हा आम्ही वर्गात काढून ठेवल्या होत्या" आम्ही सगळे असे उडालोच .वहिनीने खिसा तपासला तेव्हा तिला त्यात रुमाल मिळाला नाही आणि आमची खात्री पटली की अदलाबदली झालेली आहे.
दुसर्या दिवशी शाळेत शाळेत विचारून झाल सगळ्याना.पण कोणाची चड्डी बदल्याच कोणाच्या लक्षात आल नव्हत !!!!!

या घटनेला साधारण एक दीडवर्षा झाल असाव अजुनही खरा मालक कोण हे गुपितच आहे !!!!!