कांडला पोर्ट हे सर्व सोयीनी सुसज्ज आहे.१० बर्थ पॉइंट आहेत,६ ऑइल जेट्टी (असे यन्त्र ज्यातून ऑइल जहाजातुन काढले आणि जहाजात भरले जाते ),
१ देखभाल करणारी जेट्टी ,एक ड्राय डॉक (तिथे कोरडा कार्गो ठेवला जातो) आणि काही लहान जेट्टी आहेत.या टर्मिनल आणि जेट्टी शेजारी कोरडा कार्गो तसेच ऑइल आणि पेट्रोलियम साठवले जाते.
तसेच या पोर्ट ला १६ व्हार्फ़ क्रेन्स आहेत.(पुढील चित्र)

याशिवाय मध्यवर्ती ठिकाण असल्याने उत्तर,पश्चिम आणि मध्य भारताला जोडणारे आहे.शिवाय कांडला हे फ्री ट्रेड झोन च्या खाली येते.असे हे भारतातले पहिले पोर्ट आहे.खाद्य पदार्थ आणि ऑइल ची आयात या पोर्ट वरुन सगळ्यात जास्त होते.
१९९८ मधे मुंद्रा पोर्ट बांधले गेले.स्पेशल इकोनोमिक झोन मधे बांधले गेलेल हे पोर्ट आहे.या पोर्ट वरुन मुख्यत्वे यूरोप ,आफ्रिका अमेरिका आणि मिडल इस्ट ला जहाज वाहतुक करतात.या पोर्ट ला ८ बर्थ आणि ४ कंटेनर बर्थ आहेत.नविन असेल तरी राजस्थान ,हरियाणा,पंजाब,दिल्ली ,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,हिमाचल,उत्तरखंड आणि जम्मू आणि कश्मीर ला जोडणारे आहे.सर्व आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असून रस्ता,रेलवे आणि हवाई वाहतुक सुद्धा सहज उपलब्ध आहे.या पोर्ट चे अजुनही काम चालू असून नजीकच्या काळात आयात निर्यात क्षेत्रात याचे योगदान निश्चितच वाढणार आहे.