माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Saturday, 9 January 2010

बाल प्रश्न????

बाल मनाला पडणारे प्रश्न खरतर नेहेमीच कोडयात पाडणारे असतात.असे अनेक प्रश्न गेले कित्येक वर्ष मी ऐकतिये .नेहेमी प्रमाणे त्यासाठी माझ्याकडे उत्तर नाहीत.विशेष हे की असे प्रश्न कधीही केव्हाही कसेही येतात.ही प्रश्न विचारणारी मंडळी म्हणजे माझी भाचे कम्पनी .आणि आमच्या सोसायटी मधील सर्व लहान मुले.
ही पोस्ट आजच लिहायच कारण म्हणजे कालच आलेला नविन प्रश्न.सोसायटी मधल्या एकाने विचारलेला "ताई सायकल कशी चलते ग ?" ती कशी चालते हे त्याला सायकल समोर घेउन दाखवले ते त्याला पटल अस वाटेपर्यंत त्याचा दूसरा प्रश्न "मग आपण बाइक अशीच का चालवत नाही ?" मी गार !!!!! मी त्याला म्हटल "तू मोठा झालास की समजेल तुला " त्यावर त्याचा अजुन एक प्रश्न "मोठा म्हणजे तुझ्या सारखा ? मग तुला का माहित नाही ?" त्याच्या हा प्रश्नाच उत्तर मी अजुन शोधतिये!!!!
असेच अनेक प्रश्न कायम येतात त्यापैकी कही निवडक आणि निरुत्तर करणारे म्हणजे :फलांचा राजा आंबा का? तो तर केवढा लहान असतो .कलिंगड सगळ्यात मोठ मग तो का नाही ???"
सालिंदर नामक एक प्राणी पहिल्यांदा बघितलेला माझा मामेभाऊ!तो शत्रुवर काटे फेकतो वगैरे सांगुन त्याच्या माहितीत भर घालण्याचा प्रयत्न .त्यावर त्याचा प्रश्न "तो काटे कसे फेकतो ?मग ते काटे त्याला टोचत नाहीत का?मग एकदा काटे फेकले की परत कसे येतात ?"
घरोघरी चालू असलेला संवाद "पेट्रोल महान झाले आहे जास्त जालायाला नको वगैरे ?तसच आम्ही एकदा बोलत बसलो होतो मधेच माझा भाचा त्यावर म्हणाला " पेट्रोल जळत म्हणजे काय ?ते तर पाणी जसा असत तसच असत मग पाणी का जळत नाही ?पाणी तर रोज आपल्या नलाला येत मग तुम्ही गाडीत पाणी का घालत नाही "
अश्यासारखे बरेच प्रश्न माझ्यावर तूफ़ान हल्ला करत असतात .......एरवी इतराना गार करणारी मी ह्या मुलांसमोर शरणागति पत्कारते...........
हे प्रश्न तुम्हाला सुटले तर मला उत्तर नक्की सांगा.........आयुष्यात एकातरी लहान मुलाचे शंका समाधान करायची इच्छा आहे!!!!!

1 comment:

  1. हा...हा...चुकुन एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंत तर दुसरा प्रश्न लगेच हजर असतो...इन्फ़नाइट लूप असतो तो... :)
    एक विनंती : तुमच्या ब्लॉग टेक्स्ट कलर लाल सोडुन दुसरा केलात तर वाचायला सोपे होइल....

    ReplyDelete