माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Friday, 15 January 2010

तरुण तुर्क म्हातारे अर्क आणि लहान मुले ?

तरुण तुर्क म्हातारे अर्क हे गाजलेल नाटक जुने नाटक .ते नाटक रंगभूमीवर आल तेव्हा मी बहुतेक या जगात आलेच नव्हते .एक अप्रतिम कलाकृती बघायची राहून गेलीये.पण त्याची भरपाई म्हणून सीडी आणून त्याची पारायण केली.नुकतीच माझी भाची रुचा(वयवर्ष ७-८ ) येउन गेली.काहीतरी बघायचे करून संगणक लावून बसली आता तिला दाखवायचे काय असा प्रश्न होताच .सहज तरुण तुर्क च्या फोल्डर वर नजर केली आणि ते नाटक चालू केल.तिच्या वयाला ते झेपणार नाही आणि तीच बंद कर म्हणेल या अपेक्षेने लावले .पण तिनेच माझी विकेट काढली .संपूर्ण नाटक बघितल आणि तिची प्रश्न पेढ़ी चालू झाली .तिला मी हे नाटक का दाखवल ह्या प्रश्नाच उत्तर मी अजुन शोधतिये.तिचे नाटक दरम्यान प्रश्न असे होते की विचारायला नको .
नाटकामधला  प्रसंग एक बंड्या (सुनील तावडे ) आणि प्यारया (राजन पाटिल )हे रूम चे सिनिअर .नुकत्याच एफवाय ला आलेल्या कुंदा (अतुल परचुरे )चे वस्त्रहरण करत असतात .
रुचाची गुगली "मावशी ते काय करतायत ?"
"अग ते न त्याला त्रास देतायत " इति मी .
"म्हणजे ते रागिंग करतायत ना?"
मी गार !!!!!(तिने ३ idiot बघितलेला आहे )
पुन्हा प्रश्न "मग त्याने मोठ्या प्यांट खाली हाल्फ प्यांट का घातली आहे?त्या ३ idiot सारखी चड्डी का घातली नाहीये ?"
माझ्याकडे उत्तर नाही .मी गप्प!!!आता तिला मी काय सांगणार ?तिच्या या का च उत्तर कोणाकडे मिळणार ?पण तिच "सांग ना !" चालू होत
"बाबाना विचार " इति मी
सुदैवाने तिचे बाबा आले नव्हते पण घरी जावून तिने विचारलेच आणि मी शिव्या खाल्ल्या
प्रसंग दोन प्यारया च एक वाक्य "थर्ड पर्सन सिंग्युलर साला !"
"मावशी तो खरच थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का ग?"इति रुचा (ती कॉन्वेंट मधे शिकातिये त्यामुले इंग्लिश ग्रामर छान मावशीच इंग्लिश म्हणजे आइ ऍम द गर्ल च्या लेवल च )
मी नुसतीच नाही या अर्थाने मान हलवली .ती जरा गप्प .मावशीनेएक तरी उत्तर दिल म्हणून खुश .पण तिला काय माहित की मावशिलाच "थर्ड पर्सन सिंग्युलर" नीटस नाहीये  !!!!!
प्रसंग तीन धमी (संज्योत हर्डीकर )म्हणते "सर,ह्या बंड्या न त्यान ना ही किसड मी !!"
"तो किस दाखवला कुठे ?" रुचा
"अग ते लपले होते ना म्हणून आपल्याला दिसल नाही  "मी सांगायचा एक प्रयत्न केला
"मग त्यानी बाहेर येउन का नाही केला?३ idiots मधे दाखवला ना!"
आता चक्कर येउन पडायची माझी वेळ होती !!!!!!
सुदैवाने माझ्या मैत्रिणी अवतरल्या आणि माझी सुटका झाली (तात्पुरती )
नाटक संपल्यावर ती लगेच घरी गेल्याने मी वाचले पण आगामी प्रश्नांच काय ??????

कोणाकडे वरच्या प्रश्नांची उत्तरे तर मला सांगा ह...............

5 comments:

 1. छान लिहिलस... keep it up!!

  ReplyDelete
 2. ३ इडियट्स पहाताना माझ्या बाजुला फॅमिली होती, त्यातला लहान मुलगा असेच काहीसे प्रश्न(?) त्याच्या आईला विचारत होता...
  त्या माउलीने कसे त्याला तोंड दिले ते तिलाच माहीत...

  ReplyDelete
 3. अरे हो, फॉंट कलर बदलल्यामुळे ब्लॉग आता वाचायला छान आहे, धन्यवाद!

  ReplyDelete