माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Sunday 24 January 2010

मुंबई /न्हावा शेवा पोर्ट

भारतातील १२ पोर्ट पैकी प्रमुख आणि महत्वाचे पोर्ट म्हणजे मुंबई पोर्ट.मुंबई बद्दल वेगले काही बोलायला नकोच.
मुंबई बंदरला नुकतीच १३५ वर्षे पूर्ण झालीयेत.भारतामधे असणार सगळ्यात जुनबन्दर म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट.जून २६,१८७३ मधे ते "बॉम्बे पोर्ट ट्रस्ट" या नावाने स्थापन  झाले."प्रिंसिपल गेटवे ऑफ़ इंडिया "असे त्याला संबोधले जाते.निसर्गदत्त खोल पाण्याची देणगी या बंदरला मिळालेली आहे.४०० स्केअर किलोमीटर च कोकणाने वेढलेला किनारा लाभल्यामुले निसर्गदत्त देणगी मिळालेले बन्दर जगातील अनेक बंदरापैकी एक मानले जाते.मुंबई पोर्ट ला ३ डॉकयार्ड आहेत.डॉकयार्ड म्हणजे जिथून जहाजावर माल भरला-उतरवला जातो.इंदिरा  डॉक ,प्रिंस डॉक आणि विक्टोरिया डॉक अशी त्यांची नवे आहेत. त्यापैकी इंदिरा डॉक १९१४ मधे चालू झाले.प्रिंस डॉक १८८० मधे तर विक्टोरिया डॉक १८८८ मधे बांधले गेले.


वरच्या चित्रमधुन डॉक यार्ड कसे असते याची कल्पना येइल.
मुंबई पोर्ट सगळ्यात जुने आहे.पण भारताचा जसा जसा विकास होत गेला,आयात निर्यात वाढली तस तसे या पोर्ट वर ताणपडू लागला.आणि एका नव्या पोर्ट ची गरज भासु लागली.आणि त्यातूनच जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ची स्थापना झाली.भारतातले मोठे बन्दर म्हणून याची गणना होते.देशाचा ५०% वाहतुकीची वर्दळ या पोर्ट मधून चालते.मे २६,१९८९ मधे याची स्थापना झाली.यामधे ३ टर्मिनल्स आहेत जेएनपीटी(जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ),जीटीआय(गेटवे टर्मिनल ऑफ़ इंडिया ),एनएसआयसीटी( न्हावा शेवा इंटरनेशनल कंटेनर टर्मिनल )   जेएनपीटी आणि जीटीआय ही दोन्ही भारत सरकार तर्फे चालतात तर एनएसआयसीटी हे दुबई पोर्ट्स वर्ल्ड यांच्या मार्फ़त चालते .हे पहिले खाजगी कंपनी ने चालवलेले कंटेनर टर्मिनल आहे.
येथून होणारी निर्यात  म्हणजे कॉटन शर्ट,टी-शर्ट ,खेलाचेसाहित्य कारपेट,मेडिकल साहित्य इत्यादि
आणि आयात म्हणजे रसायने,यंत्र,आणि धातु.



पोर्ट चा लेआउट साधरण पणे असा आहे.
  भारतातील सगळ्यात मोठे आणि पहिले पोर्ट जे ब्रिटिश असताना बांधले गेले त्याची ही थोडक्यात माहिती .भारतातील दुसरे मोठे पोर्ट म्हणजे चेन्नई .त्याची माहिती पुढच्या पोस्ट मधे !!!!!!!!!

No comments:

Post a Comment