माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Wednesday, 3 February 2010

कोलकता पोर्ट

कोलकता पोर्ट हे सगळ्यात जुने आणि नदी जवळ  वसलेले पोर्ट आहे.ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने बांधले होते.मुग़ल आणि औरंगजेब कडून व्यापाराचे हक्क मिळाले मग १८७० मध्ये बांधले गेले.दुसर्या महायुद्धात या पोर्टने महत्वाची कामगिरी बजावली.जापानी सेनेने २ दा बोम्ब स्पोट केले. १९ व्या शतकात मुख्य पोर्ट होते.पण स्वातंत्र्यानंतर या पोर्ट चे महत्व कमी झाले.त्याची प्रमुख कारणे म्हणजे बंगालची फाळणी,पोर्ट चा कमी झालेला विस्तार आणि त्यामुले खालावलेली आर्थिक स्थिती.
२१ व्या शतकात या पोर्ट चा विस्तार झाला.सर्व सोयी सुविधा मिलाल्या.त्यामुले आर्थिक प्रगती  झाली.पोर्ट वरचा कामाचा बोजा वाढला.२००४-२००५ मधे सगळ्यात वेगाने प्रगती करणारे म्हणून हे पोर्ट मानले जाते.
भारतातले दुसरे कंटेनर पोर्ट म्हणून ओळखले जाते.
कोलकता पोर्ट आणि हल्दिया डॉक एकत्र पणे येथे कार्यरत आहेत.कोलकता पोर्ट ला किद्देरपोर डॉक ला १८ बर्थ आहेत,नेताजी सुभास डॉक ला १० बर्थ आहेत आणि ६ पेट्रोलियम व्हार्फ़ आहेत.

हल्दिया पोर्ट ला १२ बर्थ आहेत तसेच ३ ऑइल जेट्टी असून ३ बार्ज(खोलगट आकाराची बोट ) आहेत.
पुढील चित्रात बार्ज आणि टगबोट (बार्ज ला ओढून नेणारी बोट )

कोलकता पोर्ट ची रचना 


कोलकता पोर्ट वरुन मुख्यत्वे साखर ,तांदुळ ,लोखंड, स्टील,मशीनरी ,एलपीजी आणि जल पदार्थ आयात केले जातात तर चहा,जुट ,गहू ,मका,वगैरे निर्यात केले जातात.  

 

4 comments:

  1. स्वप्नाजी ,

    आपले लेख चागले माहितीपुर्ण आहेत,.. पण येथील काळ्या रंगावरील लेख माझ्या सारख्याला वाचावयास फारच कष्ट देत आहेत ! कही बदल करता नाही का येणार ?

    ReplyDelete
  2. माहितीपूर्ण!

    भरतात सध्या एकूण किती कंटेनर पोर्ट आहेत?

    ReplyDelete
  3. @ pethe kaka,dhanyawaaad,
    tya template cha rangch asa aahe.to mala change karata yet anhiye.sampurna templatech change karaw lagel.jar rang kasa change karayacha tumhala mahit asel tar sanga mala.

    @krishnakath ji,dhanyawaad
    bhartat ekun 12 mukhya port aahte je containerised aahet.tyachi mahiti pahilya lekhat dileli aahe.aani etarahi wahatuk tya port warun chalate.tyachi mahiti pudhil post madhe takenach.

    ReplyDelete
  4. आपण टेमप्लेटच बदललीत आणि ब्लॉग खरेचंच जरा ’ हटकेच ’ झालाय ! आभारी आहे.

    ReplyDelete