४)Flatrack: नेहेमीच्या कंटेनर पेक्षा हा वेगळा आहे.कंटेनर प्रकारात मोडत असला तरी वेगळ्या प्रकारचा हा कंटेनर असून ह्यात फक्त दोन बाजूनी बंद असतो.floor आणि दोन side wall चा मिळून हा कंटेनर बनलेला आहे.आणि एकावर एक कार्गो व्यवस्थित बांधून ठेवता यावा यासाठी व्यवस्था केलेली असते.२० आणि ४० फुट या दोन्ही प्रकारात flatrack कंटेनर उपलब्ध आहे.
साधारण या प्रकारचा हा कंटेनर असतो.
या मध्ये कार्गो बांधण्यासाठी खाचा आणि हुक उपलब्ध आहेत.त्याच्या सहाय्याने कार्गो व्यवस्थित रचून बांधला जातो.या खाचा वरील फोटो मध्ये व्यवस्थित दिसून येत आहेत.
हा कंटेनर अवजड,आकाराने मोठा,असा कार्गो वाहून नेऊ शकतो.कारण असा कार्गो सध्या कंटेनर मध्ये बसू शकत नाही.आणि सध्या कंटेनर मध्ये टाकल्यात कार्गो खराब होऊ शकतो.
५)Platforms :Flatrack कंटेनर सारखाच असतो फक्त त्याला sidewall नसतात.ह्या sidewall दुमडता येण्याजोग्या आणि काढून ठेवता येण्याजोग्या असतात.
अतिशय अवजड कार्गो यावरून वाहून नेता येतो.बेढब आकाराचा कार्गो यावर व्यवस्थित बसू शकतो.उ दा मशिनरी !
सतत प्रवाही सागराच्या पाण्यामुळे सुद्धा जहाजावर अतिशय अवजड आणि विमानाने सुद्धा न घेऊन जाता येणारा कार्गो flatrack आणि platform च्या सहाय्याने अगदी सहज वाहून नेता येतो."imported machinery " हे शब्द नेहेमीच आपल्या वाचनात,बोलण्यात येतात.पण ही "imported machinery "येते कशी हे मला या क्षेत्रामुळे कळलं!!!!आणि तुम्हाला?????
mashinery?????????????????????
ReplyDeleteतुम्हाला machinery असं म्हणायचं आहे का?
@alhadmahabal:dhanyawaad chuk dhakwun dilyabaddal.typo error hota...sudharala aahe........
ReplyDelete