४) open top container : hard top container प्रमाणेच हा पुढचा प्रकार.फरक इतकाच की छताची बाजू ही स्टील ची नसते. ती ताडपत्रीने झाकलेली असते.त्याचा हेतू एवढच असतो की सूर्यप्रकाश थोड्या-फार प्रमाणात आत यावा आणि दमात हवामानामुळे आतील कार्गो खराब होऊ नये.नाशवंत कार्गो साठी याचा उपयोग होतो.उदा.कांदा,लसूण वगैरे.
हा कंटेनर अश्या प्रकारचा असतो.
या कंटेनर चे जास्तीत जास्त वजन हे २४००० किलो २० फुटी साठी आणि ३०४८० किलो ४० फुटीसाठी ठरवलेले आहे.रिकाम्या कंटेनर चे वजन १८०० ते २४०० किलो २० फुटी चे आणि २८०० ते ४००० आणि ३९०० ते ४२०० किलो असते.म्हणजेच २० फुटी कंटेनर मध्ये २१६०० ते २२२०० किलो पर्यंत कार्गो भरता येतो.आणि ४० फुटी मध्ये २६२८० ते २७६८० किलो कार्गो भरता येतो.यावर जर त्याचे वजन गेले तर तो कंटेनर बाद ठरवण्यात येतो.
क्रमश :
Aaj sahaj ha blog wachanat ala ani khup anand zala. Evadhi changli mahiti dilyabaddal Swapna, tula dhanyawad. Yapudhe matra asha mahitipurna lekhanchi tuzya blogwar apeksha ahe. Ashich lihit raha ani wachnaryanchi baudhik bhook wadhude! Dhanyawad.
ReplyDelete_ Hemant