स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !!टिळकांचे हे वाक्य म्हणजे अफतातून होते.
या वाक्यात थोडा फार बदल करून आम्ही वापरतो एवढच !!कारण टिळक पण पुण्याचेच आणि मी सुद्धा पुण्याचीच!!
आता माझे जन्मसिद्ध हक्क म्हणजे फटकळ पणे बोलणे,पायात पाय घालून समोरच्याला पाडणे,गडगडाटी हास्य करणे वगैरे!!आता त्यात जन्मजात असलेली गोष्ट म्हणजे धडपडणे !
आता माझ्या लहान पणीची गोष्ट !!साधारण २ १/२ वर्षाची असतानाची ! (अर्थात हे माझ्या आई ने सांगितले अनुभव.उगाच तुला एवढ्या लहान पणाच मला कस आठवतंय हे विचारू नका!)
रोज संध्याकाळी आई सोबत फिरायला जायचं हा छंद !!आणि नुकतेच आई ने वाचायला शिकवले होते.तोंड वर करून रस्त्यावरच्या पाट्या वाचणे,बस,ट्रक रिक्षा वर लिहिलेले वाचणे हा नेहेमीचा उद्योग.एका शिंप्याच्या दुकानासमोर कायम धडपडायचे !!
कारण- वर बघून वाचत चालणे !!(हम ने ऐसा किया हि क्या ही जो हम नीचे देखे !!-साभार-गनुबा- पापड पोल)
बरेच दिवस त्या शिंप्याने बघितले .एक दिवस आई ला म्हणाला ,"ताई म्हसोबाला कोंबड सोडा !पोरगी रोज एकाच जागी पडतीया !!"
आता आईला हसावं का रडावं कळेना !!आता या पोरीमुळे काय काय दिव्य करावी लागनारेत हा विचार तिच्या मनात चमकून गेला असावा !!
आणि अजूनही हा हक्क मी बजावतिये!!
निर्विवाद पणे !!
No comments:
Post a Comment