कांडला पोर्ट हे तिसरे महत्वाचे पोर्ट आहे.गुजरात मधे कत्च शहरात ब्रिटिशांच्या कळत बांधले गेले आहे.महाराव श्री खेंगार्जी ३ रे आणि ब्रिटिश सरकार ने मिळून १९ व्य शतकात याची उबह्रानी केली.१९३१ मधे हे पोर्ट चालू केले.नंतर फाळणी मुले कराची पोर्ट पाकिस्तान मधे गेले आणि कांडला पोर्ट ने भारताच्या सागरी वाहतुकीमधे मोलाची भर घातली. सध्या हे पोर्ट मिनिस्ट्री ऑफ़ कॉमर्स च्या अख्त्यायारित आहे.
कांडला पोर्ट हे सर्व सोयीनी सुसज्ज आहे.१० बर्थ पॉइंट आहेत,६ ऑइल जेट्टी (असे यन्त्र ज्यातून ऑइल जहाजातुन काढले आणि जहाजात भरले जाते ),
१ देखभाल करणारी जेट्टी ,एक ड्राय डॉक (तिथे कोरडा कार्गो ठेवला जातो) आणि काही लहान जेट्टी आहेत.या टर्मिनल आणि जेट्टी शेजारी कोरडा कार्गो तसेच ऑइल आणि पेट्रोलियम साठवले जाते.
तसेच या पोर्ट ला १६ व्हार्फ़ क्रेन्स आहेत.(पुढील चित्र)
याशिवाय मध्यवर्ती ठिकाण असल्याने उत्तर,पश्चिम आणि मध्य भारताला जोडणारे आहे.शिवाय कांडला हे फ्री ट्रेड झोन च्या खाली येते.असे हे भारतातले पहिले पोर्ट आहे.खाद्य पदार्थ आणि ऑइल ची आयात या पोर्ट वरुन सगळ्यात जास्त होते.
१९९८ मधे मुंद्रा पोर्ट बांधले गेले.स्पेशल इकोनोमिक झोन मधे बांधले गेलेल हे पोर्ट आहे.या पोर्ट वरुन मुख्यत्वे यूरोप ,आफ्रिका अमेरिका आणि मिडल इस्ट ला जहाज वाहतुक करतात.या पोर्ट ला ८ बर्थ आणि ४ कंटेनर बर्थ आहेत.नविन असेल तरी राजस्थान ,हरियाणा,पंजाब,दिल्ली ,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,हिमाचल,उत्तरखंड आणि जम्मू आणि कश्मीर ला जोडणारे आहे.सर्व आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असून रस्ता,रेलवे आणि हवाई वाहतुक सुद्धा सहज उपलब्ध आहे.या पोर्ट चे अजुनही काम चालू असून नजीकच्या काळात आयात निर्यात क्षेत्रात याचे योगदान निश्चितच वाढणार आहे.
माझ्याबद्दल वाचू नये असे
- स्वप्ना
- एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!
Thursday, 28 January 2010
Tuesday, 26 January 2010
चेन्नई पोर्ट
मुंबई /न्हावा शेवा पाठोपाठ चेन्नई पोर्ट चा दूसरा क्रमांक लागतो .चेन्नई हे भारतातले दुसरे मोठे पोर्ट आहे.पश्चिम भारतात मुंबई जसे आयात-निर्यात क्षेत्रात मोठा हातभार लावते तसेच दक्षिण भारतात चेन्नई पोर्ट कार्यरत आहे.या पोर्ट ला १२५ वर्ष पूर्ण झालेली आहेत. आयात-निर्यती साठी उपयोगात येण्या आधी हे पोर्ट पर्यटन साठी उपयोगात होते.हे मानवनिर्मित पोर्ट आहे.१८६१ मधे याची बांधणी झाली होती परन्तु १८६८ आणि १८७२ मधल्या वादळ मुले याची वाताहत झाली १८७६ मधे एल आकाराचे breakwater अर्थात बांध घालायला सुरुवात केली पण पुन्हा १८८१ च्या वदालत पूर्ण बन्दर उध्वस्थ झाले.चेन्नई पोर्ट ट्रस्ट ने पुन्हा नव्या उमेदीने १८८१ मधे उभारलेले हे पोर्ट मोठ्या दिमाखात १२५ वर्ष पूर्ण करत आहे.
निशंक पणे या शहराची वाढ या पोर्ट मुले लवकर झाली .औद्योगिक विकास ही झपाट्याने झाला.
चेन्नई पोर्ट ला ३ डॉक आहेत डॉ.आंबेडकर डॉक ,सताब्त जवाहर डॉक आणि भारती डॉक.चेन्नई चे कंटेनर टर्मिनल सुद्धा दुबई पोर्ट वर्ल्ड मार्फ़त चालवले जाते.
चेन्नई वरुन आयातित मुख्यत्वे लोखंड,कोलसा,पेट्रोलियम प्रोदुक्ट्स आणि जनरल कार्गो हाताळला जातो.निर्यात मधे शेंगदाने व त्यासह तेल,चहा ,कांदा याचा समावेश होतो.चेन्नई वरुन मुख्यत्वे सिंगापूर ,मलेशिया ,थायलंड ,म्यानमार,श्रीलंका ,कोरिया ,चाइना ,मेडिटेरियन,यूरोप ऑस्ट्रेलिया ,यूएस ला सर्विस देतात.
या पोर्ट ला एकून २१ बर्थ पॉइंट (जिथे जहाज लगते )असून त्यातले ३ पॉइंट भारतीय नौ सेनेला देण्यात आले आहेत.
चेन्नई नंतर नम्बर लागतो तो मुंद्रा-कांडला पोर्ट चा.त्याबद्दल पुढच्या पोस्ट मधे.

Sunday, 24 January 2010
मुंबई /न्हावा शेवा पोर्ट
भारतातील १२ पोर्ट पैकी प्रमुख आणि महत्वाचे पोर्ट म्हणजे मुंबई पोर्ट.मुंबई बद्दल वेगले काही बोलायला नकोच.
मुंबई बंदरला नुकतीच १३५ वर्षे पूर्ण झालीयेत.भारतामधे असणार सगळ्यात जुनबन्दर म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट.जून २६,१८७३ मधे ते "बॉम्बे पोर्ट ट्रस्ट" या नावाने स्थापन झाले."प्रिंसिपल गेटवे ऑफ़ इंडिया "असे त्याला संबोधले जाते.निसर्गदत्त खोल पाण्याची देणगी या बंदरला मिळालेली आहे.४०० स्केअर किलोमीटर च कोकणाने वेढलेला किनारा लाभल्यामुले निसर्गदत्त देणगी मिळालेले बन्दर जगातील अनेक बंदरापैकी एक मानले जाते.मुंबई पोर्ट ला ३ डॉकयार्ड आहेत.डॉकयार्ड म्हणजे जिथून जहाजावर माल भरला-उतरवला जातो.इंदिरा डॉक ,प्रिंस डॉक आणि विक्टोरिया डॉक अशी त्यांची नवे आहेत. त्यापैकी इंदिरा डॉक १९१४ मधे चालू झाले.प्रिंस डॉक १८८० मधे तर विक्टोरिया डॉक १८८८ मधे बांधले गेले.

वरच्या चित्रमधुन डॉक यार्ड कसे असते याची कल्पना येइल.
मुंबई पोर्ट सगळ्यात जुने आहे.पण भारताचा जसा जसा विकास होत गेला,आयात निर्यात वाढली तस तसे या पोर्ट वर ताणपडू लागला.आणि एका नव्या पोर्ट ची गरज भासु लागली.आणि त्यातूनच जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ची स्थापना झाली.भारतातले मोठे बन्दर म्हणून याची गणना होते.देशाचा ५०% वाहतुकीची वर्दळ या पोर्ट मधून चालते.मे २६,१९८९ मधे याची स्थापना झाली.यामधे ३ टर्मिनल्स आहेत जेएनपीटी(जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ),जीटीआय(गेटवे टर्मिनल ऑफ़ इंडिया ),एनएसआयसीटी( न्हावा शेवा इंटरनेशनल कंटेनर टर्मिनल ) जेएनपीटी आणि जीटीआय ही दोन्ही भारत सरकार तर्फे चालतात तर एनएसआयसीटी हे दुबई पोर्ट्स वर्ल्ड यांच्या मार्फ़त चालते .हे पहिले खाजगी कंपनी ने चालवलेले कंटेनर टर्मिनल आहे.
येथून होणारी निर्यात म्हणजे कॉटन शर्ट,टी-शर्ट ,खेलाचेसाहित्य कारपेट,मेडिकल साहित्य इत्यादि
आणि आयात म्हणजे रसायने,यंत्र,आणि धातु.
पोर्ट चा लेआउट साधरण पणे असा आहे.
भारतातील सगळ्यात मोठे आणि पहिले पोर्ट जे ब्रिटिश असताना बांधले गेले त्याची ही थोडक्यात माहिती .भारतातील दुसरे मोठे पोर्ट म्हणजे चेन्नई .त्याची माहिती पुढच्या पोस्ट मधे !!!!!!!!!
Monday, 18 January 2010
माझे "आंतरराष्ट्रीय व्यापार " विश्व
खरतर आंतर राष्ट्रीय व्यापार हे क्षेत्र तस खुपच मोठ .पण काहीतरी नविन आणि हटके शिकयाच्या उद्देशाने मी या क्षेत्रात आले .खुप काही नविन माहिती मिळाली.अर्थ व्यवस्था मधला हा एक हिस्सा.आयत-निर्यात क्षेत्र .त्याबद्दल माझ्याकडे जी माहिती आहे ती यथाशक्ति तुम्हाला सांगणार आहे.ही माहिती तशी खुप रस घेण्यासारखी आहे !!!रोज काहीतरी नविन माहिती देण्याचा विचार आहे.!पण बघुयात कसा जमतय ते!!!!!!
कोणताही देश स्वयंपूर्ण नाही .एखादी गोष्ट त्या देशाकडे उपलब्ध नसेल तर ती दुसर्या देशाकडून आयात करण्या वाचून पर्याय नसतो.आणि जय देशाकडे एखादी गोष्ट मुबलक असते ती त्याना सहजपणे गरजू देशाना निर्यात करता येते.या आयात-निर्यात मधुनच आंतर राष्ट्रीय व्यापाराची संकल्पना पुढे आली.पूर्वीच्या पद्धतीत आणि आताच्या पद्धतीत खुप फरक आहे.सध्या चालू असलेला व्यापार हा जलमार्गाने आणि वायुमार्गाने चालतो.पण वायुमार्गावर बंधने आहेत.त्यापेक्षा जलमार्ग सुलभ आणि सोपा पडतो.
भारताला ७६०० किलोमीटर चे बन्दर लाभले आहे.त्याला जगातील सगळ्यात मोठे peninsulas आहे.याचा अर्थ पाण्याने तीन बाजूने वेढ़लेली जमीन पण ती मुख्या जमिनीशी जोडलेली आहे.भारताचा नकाशा बघितला की सहजपणे हे लक्षात येते.
भारतात प्रामुख्याने १२ मोठी बंदरे(seaport )आहेत.आणि इतर १८५ छोट्या बन्दारामार्फत अंतर्गत व्यापार चालतो .प्रमुख बंदरामधे न्हावा शेवा,चेन्नई ,मुंद्रा वगैरे बंदराचा समावेश होतो.पुढच्या नकाशात ती प्रमुख बार बंदरे सहजपणे लक्षात येतात.
या सर्व बंदराची माहिती पुढच्या लेखात...............

Saturday, 16 January 2010
बस चुकली !पण कोणाची ???
बसचा प्रवास म्हणजे एक दिव्य असते .हे दिव्य गेले कित्येक वर्ष मी करतिये .बस चुकली तर काय होत माहित असेलच तुम्हाला पण ती जर बसच्या कंडक्टर ची चुकली तर ?????तिच एक मजा अशी .
संध्याकाळी ६ ची वेळ .बस अगदी गच्च भरलेली .मुंगी शिरायला पण जागा नव्हती .चालक नेहेमी प्रमाणे बेल वाजल्यावर निघाला .स्वारगेट वरुन बस जेमतेम लक्ष्मी नारायण चौकात पोहोचली .बस मधे कोणीतरी अचानक ओरडल "बस थाम्बावा कोणीतरी बस पकडायला पळत येतय!" आम्ही सगळे विचार करत होतो की कोणाला अवधी घाई आहे जो रस्त्यातून पळत येतय .तेवढ्यात ती व्यक्ति अवतरली
आणि अहो आश्चर्यम बस च वाहक (कंडक्टर ) होता !!!!!
आम्ही हसून हसून वेडे झालो .तो चढला आणि धापा टाकत चालकाला म्हणाला "मी आल्याशिवाय तू बस सोडली कशी ?"
चालक म्हणाला "अरे बेल वाजली मला वाटल तूच दिलीस आणि गर्दी मुले दिसला नाहीस म्हणून निघालो !"
वास्तविक शेवटचा स्टॉप असल्याने तो रिपोर्ट करायला खाली उतरला आणि गर्दीत कोणाच्या तरी हातून बेल वाजली .आणि गर्दी मुले पुढच्या लोकाना वाटल वाहक मागे आहे आणि मागच्या लोकाना वाटल तो पुढे आहे !!!!!!!
तेव्हापासून तो सगळ्यात आधी बस मधे चढतो रिपोर्ट करून, मग लोकाना घेतो !!!!!!!!

Friday, 15 January 2010
तरुण तुर्क म्हातारे अर्क आणि लहान मुले ?
तरुण तुर्क म्हातारे अर्क हे गाजलेल नाटक जुने नाटक .ते नाटक रंगभूमीवर आल तेव्हा मी बहुतेक या जगात आलेच नव्हते .एक अप्रतिम कलाकृती बघायची राहून गेलीये.पण त्याची भरपाई म्हणून सीडी आणून त्याची पारायण केली.नुकतीच माझी भाची रुचा(वयवर्ष ७-८ ) येउन गेली.काहीतरी बघायचे करून संगणक लावून बसली आता तिला दाखवायचे काय असा प्रश्न होताच .सहज तरुण तुर्क च्या फोल्डर वर नजर केली आणि ते नाटक चालू केल.तिच्या वयाला ते झेपणार नाही आणि तीच बंद कर म्हणेल या अपेक्षेने लावले .पण तिनेच माझी विकेट काढली .संपूर्ण नाटक बघितल आणि तिची प्रश्न पेढ़ी चालू झाली .तिला मी हे नाटक का दाखवल ह्या प्रश्नाच उत्तर मी अजुन शोधतिये.तिचे नाटक दरम्यान प्रश्न असे होते की विचारायला नको .
नाटकामधला प्रसंग एक बंड्या (सुनील तावडे ) आणि प्यारया (राजन पाटिल )हे रूम चे सिनिअर .नुकत्याच एफवाय ला आलेल्या कुंदा (अतुल परचुरे )चे वस्त्रहरण करत असतात .
रुचाची गुगली "मावशी ते काय करतायत ?"
"अग ते न त्याला त्रास देतायत " इति मी .
"म्हणजे ते रागिंग करतायत ना?"
मी गार !!!!!(तिने ३ idiot बघितलेला आहे )
पुन्हा प्रश्न "मग त्याने मोठ्या प्यांट खाली हाल्फ प्यांट का घातली आहे?त्या ३ idiot सारखी चड्डी का घातली नाहीये ?"
माझ्याकडे उत्तर नाही .मी गप्प!!!आता तिला मी काय सांगणार ?तिच्या या का च उत्तर कोणाकडे मिळणार ?पण तिच "सांग ना !" चालू होत
"बाबाना विचार " इति मी
सुदैवाने तिचे बाबा आले नव्हते पण घरी जावून तिने विचारलेच आणि मी शिव्या खाल्ल्या
प्रसंग दोन प्यारया च एक वाक्य "थर्ड पर्सन सिंग्युलर साला !"
"मावशी तो खरच थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का ग?"इति रुचा (ती कॉन्वेंट मधे शिकातिये त्यामुले इंग्लिश ग्रामर छान मावशीच इंग्लिश म्हणजे आइ ऍम द गर्ल च्या लेवल च )
मी नुसतीच नाही या अर्थाने मान हलवली .ती जरा गप्प .मावशीनेएक तरी उत्तर दिल म्हणून खुश .पण तिला काय माहित की मावशिलाच "थर्ड पर्सन सिंग्युलर" नीटस नाहीये !!!!!
प्रसंग तीन धमी (संज्योत हर्डीकर )म्हणते "सर,ह्या बंड्या न त्यान ना ही किसड मी !!"
"तो किस दाखवला कुठे ?" रुचा
"अग ते लपले होते ना म्हणून आपल्याला दिसल नाही "मी सांगायचा एक प्रयत्न केला
"मग त्यानी बाहेर येउन का नाही केला?३ idiots मधे दाखवला ना!"
आता चक्कर येउन पडायची माझी वेळ होती !!!!!!
सुदैवाने माझ्या मैत्रिणी अवतरल्या आणि माझी सुटका झाली (तात्पुरती )
नाटक संपल्यावर ती लगेच घरी गेल्याने मी वाचले पण आगामी प्रश्नांच काय ??????
कोणाकडे वरच्या प्रश्नांची उत्तरे तर मला सांगा ह...............

Wednesday, 13 January 2010
तीळ आणि गुळ
एकदा एका बोक्याने ढकलले गुळ ला
त्यात वरुन पाडले तीळ ला
तीळ चिकटला गुळ ला
आणि लागला रडायला
म्हणाला "आता आपण चिकटलो
बिन कामाचेच झालो
आता आपल्याशी कोणीच बोलणार नाही,
आणि आपण कोणालाच आवडणार नाही !"
आवाज ऐकून छोटी ताई आली धावत
आणि तिला पाहून बोका सुटला पळत
उचलले तिने अलगत दोघाना
"रडू नका रे" म्हणाली त्याना
तुम्ही दोघे एकत्र सर्वाना आवडाल
एक मोठा आनंद दयाल
"तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला
सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका "
सगलेच खुश होउन तुम्हाला देतील-घेतील
मकर संक्रांतिचा आनंद लुटतील
तुमच्याशिवाय संक्रात होणार नाही साजरी
तुम्ही लावाल दरवर्षी हजेरी
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा सर्वाना देवुया
आणि या सणाचा आनंद लुटुया!!!!!!
ता क :कुठूनही साभार परत न आलेली एक बाल कल्पना !!!!!!!

Monday, 11 January 2010
झोपेची आराधना कुठेही आणि कधीही (?)
एक जिव्हाळ्याचा विषय !!!!!झोप !!!!!
मला अजुनही अस एक महाभाग भेटला नाही की ज्याला झोपायला आवडत नाही.पु.लं.नी त्यांच्या "म्हैस " मधे झोपेचे वर्णन अप्रतिम केलय."कुणी झोप चाखत होते ,कुणी गिळत होते " अशी शब्द रचना फक्त तेच करू शकतात .मी बघितलेले झोपेचे प्रकार जरा चमत्कारिक आहेत.कारण हे प्रकार मी लग्नात,बसमधे ,एस टी मधे ,रेल वे मधे ,शाळेत ,कॉलेज मधे बघितलेले आहेत .आणि विशेष असे की कोणताही प्रकार एक सारखा नाही .
लग्नामधे सगळ्यात बोरिंग प्रकार म्हणजे विधी!एकतर त्यासाठी फक्त मुलगा-मुलगी-त्यांचे आई-वडिल या लोकांसाठीच असतो .बाकीचे नातेवाइक नावापुरते असतात .त्यातल्या त्यात बायकांना मिरवा-मिरवी करता येते.लहान मुले मोकाट सुटलेली असतात .प्रश्न असतो तो पुरुष मंडळीचा .सकाळी लवकर उठून अंघोळ-चहा-नाश्ता करून चांगले कपडे घालून फक्त दुपारच्या जेवणाची वाट बघायची असते .चार-पाच मंडळी जमून गप्पा चालू असतात .नंतर जस-जसा वेळ पुढे सरकतो या मंडळीच्या गप्पा ओसरतात .मग कोणी खुर्चीवर बसल्या बसल्या पेंगतात.मानेचे झोके जात असतात मधेच खडबडून जागे होतात स्वत: कुठे आहोत याची आधी खात्री करून घेतात .अंदाज आला की पुन्हा निद्रादेवी च्या स्वाधीन होतात.कोणी लहान मुलांना झोपवता झोपवता स्वत :ताणून देतात.कुणी चक्क घोरत पडतात.
बस आणि एस टी मधे झोपायचे प्रकार पण अजब आहेत .कोणी पुस्तक वाचता वाचता झोपतो कुणी कानात हेडफोन घालून झोपतो .आणि ज्यांच्या नाकावर चश्मा असतो तो जागा आहे की झोपलेला तेच कळत नाही.एकतर बस-एस टी च्या वेगाने सगळेच हालत असतात तय मुले जाणारे झोके वेगाने आहेत की झोपेचे ते कळत नाही.कधी-कधी दुसर्याच्या खांद्यावर डोक टाकुन झोपतात.तो प्रसंग पण मस्त असतो .शेजारी जर बाई असेल तर ती अशी शंकेने बघत असते .शेजारच्या आपल्या अंगावर पडणार नाही या साठी कसरत करत असते.पुरुष मंडळी असतील तर ढकला-ढकाली चालू असते.लहान मूल ओढा-ओढ़ी करत असते.आणि झोपलेला मधेच जर जागा झाला तर खिडकितुन बाहेर बघतो इच्छित स्थळ गेले की यायचेय हे बघायला !यायचे असेल तर निवांत होतो परत डोळे मिटू लागतो आणि समजा गेले असेल तर उतरन्यासाठी धडपडत असतो .
शाळेत झोपायचे प्रकार म्हणजे एकतर वाही/पुस्तक खाली मण्डीवर ठेवून टेबल वर डोके ठेवून झोपणे.दूसरा म्हणजे टेबलवर वहीवर डोके ठेवणे आणि चेहरा दिसणार नाही अश्या पध्धातिने हात ठेवणे.अजुन एक प्रकार म्हणजे उंच लोकांच्या मागे बसणे.घोळक्यात बसणे .लिहिता लिहिता झोपण्याचा प्रकार तर प्रसिध्ध आहे ........
असे अनेक प्रकार तुम्ही बघितले असतील...........मलाही सांगाल तुंचे अनुभव????????
ता.क. सगळे प्रकार मी स्वत :बघितलेले आहेत तरी यापैकी कोणत्याही प्रकारात तुम्ही मोडत असल्यास तो योगायोग समजावा.

Saturday, 9 January 2010
बाल प्रश्न????
बाल मनाला पडणारे प्रश्न खरतर नेहेमीच कोडयात पाडणारे असतात.असे अनेक प्रश्न गेले कित्येक वर्ष मी ऐकतिये .नेहेमी प्रमाणे त्यासाठी माझ्याकडे उत्तर नाहीत.विशेष हे की असे प्रश्न कधीही केव्हाही कसेही येतात.ही प्रश्न विचारणारी मंडळी म्हणजे माझी भाचे कम्पनी .आणि आमच्या सोसायटी मधील सर्व लहान मुले.
ही पोस्ट आजच लिहायच कारण म्हणजे कालच आलेला नविन प्रश्न.सोसायटी मधल्या एकाने विचारलेला "ताई सायकल कशी चलते ग ?" ती कशी चालते हे त्याला सायकल समोर घेउन दाखवले ते त्याला पटल अस वाटेपर्यंत त्याचा दूसरा प्रश्न "मग आपण बाइक अशीच का चालवत नाही ?" मी गार !!!!! मी त्याला म्हटल "तू मोठा झालास की समजेल तुला " त्यावर त्याचा अजुन एक प्रश्न "मोठा म्हणजे तुझ्या सारखा ? मग तुला का माहित नाही ?" त्याच्या हा प्रश्नाच उत्तर मी अजुन शोधतिये!!!!
असेच अनेक प्रश्न कायम येतात त्यापैकी कही निवडक आणि निरुत्तर करणारे म्हणजे :फलांचा राजा आंबा का? तो तर केवढा लहान असतो .कलिंगड सगळ्यात मोठ मग तो का नाही ???"
सालिंदर नामक एक प्राणी पहिल्यांदा बघितलेला माझा मामेभाऊ!तो शत्रुवर काटे फेकतो वगैरे सांगुन त्याच्या माहितीत भर घालण्याचा प्रयत्न .त्यावर त्याचा प्रश्न "तो काटे कसे फेकतो ?मग ते काटे त्याला टोचत नाहीत का?मग एकदा काटे फेकले की परत कसे येतात ?"
घरोघरी चालू असलेला संवाद "पेट्रोल महान झाले आहे जास्त जालायाला नको वगैरे ?तसच आम्ही एकदा बोलत बसलो होतो मधेच माझा भाचा त्यावर म्हणाला " पेट्रोल जळत म्हणजे काय ?ते तर पाणी जसा असत तसच असत मग पाणी का जळत नाही ?पाणी तर रोज आपल्या नलाला येत मग तुम्ही गाडीत पाणी का घालत नाही "
अश्यासारखे बरेच प्रश्न माझ्यावर तूफ़ान हल्ला करत असतात .......एरवी इतराना गार करणारी मी ह्या मुलांसमोर शरणागति पत्कारते...........
हे प्रश्न तुम्हाला सुटले तर मला उत्तर नक्की सांगा.........आयुष्यात एकातरी लहान मुलाचे शंका समाधान करायची इच्छा आहे!!!!!

Monday, 4 January 2010
खरा मालक कोण ?
शीर्षक पाहून घाबरू नका .कोणत्याही मालमत्ता च्या केस बद्दल बोलणार नाहीये .मालकी हक्क हे कोणत्याही गोष्टीचे असू शकतात .अगदी मालमत्तेपासून माणसापर्यंत!!!!अश्याच एक छोट्या वस्तुची मजेदार आणि कधीही न विसरता येणारी ही कथा
माझा भाचा अथर्व वय वर्ष ३-४ च्या आसपास.शालेचा पहिलाच दिवस .मस्तपैकी तयार होउन शाळेत आलेला.नविन ड्रेस,बूट,दप्तर वगैरे घेउन.माझ्याच शाळेत म्हणजे नविन मराठीमधे त्याला घातले होते .त्यामुले सोडायला मी पण गेले होते.
पहिलाच दिवस आणि शाला फुलून गेली होती.शाळेत गेल्यावर फार छान वाटल होत.एक तास शाला होती.अथर्वचा ड्रेस नविन असल्यामुळे चड्डी(आता शालेच्या चड्डीला प्यांट म्हणन म्हणजे ........................ ) थोड़ी मोठीच होती .साधारण एक तासाने शाला सुटली.जवळच गौरी मस्तानी मधे मस्तानी खायला चाललो होतो .अथर्व सारखा चड्डी सावरत होता.वहिनीला थोड़ी शंका आली की काहीतरी घोळ आहे.अथर्व ला विचारले सुध्धा काय होतय ते पण तो काहीच बोलला नाही म्हणून आम्ही पण सोडून दिले .आणि मस्तानी खाताखाता एकदम तो म्हणाला "अग आई ही माझी चड्डी नाहीये .आम्हला शू करायला एकत्र नेल होत तेव्हा आम्ही वर्गात काढून ठेवल्या होत्या" आम्ही सगळे असे उडालोच .वहिनीने खिसा तपासला तेव्हा तिला त्यात रुमाल मिळाला नाही आणि आमची खात्री पटली की अदलाबदली झालेली आहे.
दुसर्या दिवशी शाळेत शाळेत विचारून झाल सगळ्याना.पण कोणाची चड्डी बदल्याच कोणाच्या लक्षात आल नव्हत !!!!!
या घटनेला साधारण एक दीडवर्षा झाल असाव अजुनही खरा मालक कोण हे गुपितच आहे !!!!!

Subscribe to:
Posts (Atom)