एक जिव्हाळ्याचा विषय !!!!!झोप !!!!!
मला अजुनही अस एक महाभाग भेटला नाही की ज्याला झोपायला आवडत नाही.पु.लं.नी त्यांच्या "म्हैस " मधे झोपेचे वर्णन अप्रतिम केलय."कुणी झोप चाखत होते ,कुणी गिळत होते " अशी शब्द रचना फक्त तेच करू शकतात .मी बघितलेले झोपेचे प्रकार जरा चमत्कारिक आहेत.कारण हे प्रकार मी लग्नात,बसमधे ,एस टी मधे ,रेल वे मधे ,शाळेत ,कॉलेज मधे बघितलेले आहेत .आणि विशेष असे की कोणताही प्रकार एक सारखा नाही .
लग्नामधे सगळ्यात बोरिंग प्रकार म्हणजे विधी!एकतर त्यासाठी फक्त मुलगा-मुलगी-त्यांचे आई-वडिल या लोकांसाठीच असतो .बाकीचे नातेवाइक नावापुरते असतात .त्यातल्या त्यात बायकांना मिरवा-मिरवी करता येते.लहान मुले मोकाट सुटलेली असतात .प्रश्न असतो तो पुरुष मंडळीचा .सकाळी लवकर उठून अंघोळ-चहा-नाश्ता करून चांगले कपडे घालून फक्त दुपारच्या जेवणाची वाट बघायची असते .चार-पाच मंडळी जमून गप्पा चालू असतात .नंतर जस-जसा वेळ पुढे सरकतो या मंडळीच्या गप्पा ओसरतात .मग कोणी खुर्चीवर बसल्या बसल्या पेंगतात.मानेचे झोके जात असतात मधेच खडबडून जागे होतात स्वत: कुठे आहोत याची आधी खात्री करून घेतात .अंदाज आला की पुन्हा निद्रादेवी च्या स्वाधीन होतात.कोणी लहान मुलांना झोपवता झोपवता स्वत :ताणून देतात.कुणी चक्क घोरत पडतात.
बस आणि एस टी मधे झोपायचे प्रकार पण अजब आहेत .कोणी पुस्तक वाचता वाचता झोपतो कुणी कानात हेडफोन घालून झोपतो .आणि ज्यांच्या नाकावर चश्मा असतो तो जागा आहे की झोपलेला तेच कळत नाही.एकतर बस-एस टी च्या वेगाने सगळेच हालत असतात तय मुले जाणारे झोके वेगाने आहेत की झोपेचे ते कळत नाही.कधी-कधी दुसर्याच्या खांद्यावर डोक टाकुन झोपतात.तो प्रसंग पण मस्त असतो .शेजारी जर बाई असेल तर ती अशी शंकेने बघत असते .शेजारच्या आपल्या अंगावर पडणार नाही या साठी कसरत करत असते.पुरुष मंडळी असतील तर ढकला-ढकाली चालू असते.लहान मूल ओढा-ओढ़ी करत असते.आणि झोपलेला मधेच जर जागा झाला तर खिडकितुन बाहेर बघतो इच्छित स्थळ गेले की यायचेय हे बघायला !यायचे असेल तर निवांत होतो परत डोळे मिटू लागतो आणि समजा गेले असेल तर उतरन्यासाठी धडपडत असतो .
शाळेत झोपायचे प्रकार म्हणजे एकतर वाही/पुस्तक खाली मण्डीवर ठेवून टेबल वर डोके ठेवून झोपणे.दूसरा म्हणजे टेबलवर वहीवर डोके ठेवणे आणि चेहरा दिसणार नाही अश्या पध्धातिने हात ठेवणे.अजुन एक प्रकार म्हणजे उंच लोकांच्या मागे बसणे.घोळक्यात बसणे .लिहिता लिहिता झोपण्याचा प्रकार तर प्रसिध्ध आहे ........
असे अनेक प्रकार तुम्ही बघितले असतील...........मलाही सांगाल तुंचे अनुभव????????
ता.क. सगळे प्रकार मी स्वत :बघितलेले आहेत तरी यापैकी कोणत्याही प्रकारात तुम्ही मोडत असल्यास तो योगायोग समजावा.
Chhan lihilay...
ReplyDeleteMajha anubhav mhanje office madhe zoapanyahcha.. :)
Dole disanar nahi asa kapalawar hat thewayacha .. Cap sarakha... ani mag laptop kade baghat dulakya marayachya... hahaha
hey sachin dhanyawaad.....ajun ek navin prakar jhopechi aaradhana karayacha......mast aahe.pan tuze boss wagaire nahiyet na blog war?nahitar vachun tulach ghayache khopchyat.......
ReplyDeleteMastach lihilay. hyatalya shala , cllg madhye zopanaryanchya prakarat mi modate.
ReplyDeleteAani ho ajoon ek...... Mi bhetaley barr kaa ashya mahabhagala jyala zopechi cheed yete aani zopayala mulich aavadat naahi.
Maza tar vishwaasach naahi basala aadhi pan aahet ashi vichitra maanase jagat.....
ह्या सगळ्यातुन मी सुद्धा गेलोय, मजा आली वाचताना...
ReplyDeleteछान लिहिलय..
ReplyDeleteझोपेची मला पण जाम आवड. M.C.A. करताना lecture चालू असताना माझी इतकी हिम्मत असायची की मी first bench वर बसून बिनधास्त झोपयाचो...
माझ्या मित्राना जाम टेंशन यायचे.. Sir बिचारे चांगले होते काही बोलत नसत..
जॉब निमित्ताने दिल्लीत आहे आणि आता दिल्लीत तर जाम ठंडी पडलीय, अश्या ह्या थंडित रजाई पांघरून ज़ोपताना जे स्वर्गसुख मिलते ते पु ल च्या उपमा वापरुनही व्यक्त नाही करू शकत... I love zop...:)