शीर्षक पाहून घाबरू नका .कोणत्याही मालमत्ता च्या केस बद्दल बोलणार नाहीये .मालकी हक्क हे कोणत्याही गोष्टीचे असू शकतात .अगदी मालमत्तेपासून माणसापर्यंत!!!!अश्याच एक छोट्या वस्तुची मजेदार आणि कधीही न विसरता येणारी ही कथा
माझा भाचा अथर्व वय वर्ष ३-४ च्या आसपास.शालेचा पहिलाच दिवस .मस्तपैकी तयार होउन शाळेत आलेला.नविन ड्रेस,बूट,दप्तर वगैरे घेउन.माझ्याच शाळेत म्हणजे नविन मराठीमधे त्याला घातले होते .त्यामुले सोडायला मी पण गेले होते.
पहिलाच दिवस आणि शाला फुलून गेली होती.शाळेत गेल्यावर फार छान वाटल होत.एक तास शाला होती.अथर्वचा ड्रेस नविन असल्यामुळे चड्डी(आता शालेच्या चड्डीला प्यांट म्हणन म्हणजे ........................ ) थोड़ी मोठीच होती .साधारण एक तासाने शाला सुटली.जवळच गौरी मस्तानी मधे मस्तानी खायला चाललो होतो .अथर्व सारखा चड्डी सावरत होता.वहिनीला थोड़ी शंका आली की काहीतरी घोळ आहे.अथर्व ला विचारले सुध्धा काय होतय ते पण तो काहीच बोलला नाही म्हणून आम्ही पण सोडून दिले .आणि मस्तानी खाताखाता एकदम तो म्हणाला "अग आई ही माझी चड्डी नाहीये .आम्हला शू करायला एकत्र नेल होत तेव्हा आम्ही वर्गात काढून ठेवल्या होत्या" आम्ही सगळे असे उडालोच .वहिनीने खिसा तपासला तेव्हा तिला त्यात रुमाल मिळाला नाही आणि आमची खात्री पटली की अदलाबदली झालेली आहे.
दुसर्या दिवशी शाळेत शाळेत विचारून झाल सगळ्याना.पण कोणाची चड्डी बदल्याच कोणाच्या लक्षात आल नव्हत !!!!!
या घटनेला साधारण एक दीडवर्षा झाल असाव अजुनही खरा मालक कोण हे गुपितच आहे !!!!!
haaaha ha great
ReplyDeleteहा..हा.. भारीच किस्सा आहे...
ReplyDelete