बसचा प्रवास म्हणजे एक दिव्य असते .हे दिव्य गेले कित्येक वर्ष मी करतिये .बस चुकली तर काय होत माहित असेलच तुम्हाला पण ती जर बसच्या कंडक्टर ची चुकली तर ?????तिच एक मजा अशी .
संध्याकाळी ६ ची वेळ .बस अगदी गच्च भरलेली .मुंगी शिरायला पण जागा नव्हती .चालक नेहेमी प्रमाणे बेल वाजल्यावर निघाला .स्वारगेट वरुन बस जेमतेम लक्ष्मी नारायण चौकात पोहोचली .बस मधे कोणीतरी अचानक ओरडल "बस थाम्बावा कोणीतरी बस पकडायला पळत येतय!" आम्ही सगळे विचार करत होतो की कोणाला अवधी घाई आहे जो रस्त्यातून पळत येतय .तेवढ्यात ती व्यक्ति अवतरली
आणि अहो आश्चर्यम बस च वाहक (कंडक्टर ) होता !!!!!
आम्ही हसून हसून वेडे झालो .तो चढला आणि धापा टाकत चालकाला म्हणाला "मी आल्याशिवाय तू बस सोडली कशी ?"
चालक म्हणाला "अरे बेल वाजली मला वाटल तूच दिलीस आणि गर्दी मुले दिसला नाहीस म्हणून निघालो !"
वास्तविक शेवटचा स्टॉप असल्याने तो रिपोर्ट करायला खाली उतरला आणि गर्दीत कोणाच्या तरी हातून बेल वाजली .आणि गर्दी मुले पुढच्या लोकाना वाटल वाहक मागे आहे आणि मागच्या लोकाना वाटल तो पुढे आहे !!!!!!!
तेव्हापासून तो सगळ्यात आधी बस मधे चढतो रिपोर्ट करून, मग लोकाना घेतो !!!!!!!!
मस्त हलक-फुलक लिहिलय. :)
ReplyDeleteसॉलिड किस्सा आहे ... :)
ReplyDeleteLOLLL :)
ReplyDeleteaaila bharich....
ReplyDeleteआयला शॉलीड किस्सा आहे.. :) :)
ReplyDelete