आयात निर्यात क्षेत्रातली बाराखडी चालू करतीये!!आता तुम्ही म्हणाल हि पहिली -दुसरीच्या वर्गाचा तास गेह्तीये का?पण ही सगळी क्षेत्रच अशी आहेत की बाराखडी पासून शिकावच लागतं!त्या शिवाय पुढे जाताच येत नाही !!!एम एस ची चित्रा च्या अपघात नंतर तुम्ही या कंटेनर गोष्टीशी परिचयाचे असालच.
आता कंटेनर म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एक आयताकृती डब्बा!!तो असा असतो .....
साधारण १७८० च्या आस-पास याची सुरुवात झाली. प्रामुख्याने याचा उपयोग कोळसा वाहून नेण्यासाठी केला जायचा.आणि तो ही नदी किंवा तलावात!!!यासाठी loose boxes वापरले जायचे.१८३० मध्ये छोटे कंटेनर वापरले जायचे.आताच्या तुलनेत हे कंटेनर खूपच छोटे होते.१८४० मध्ये लाकडी आणि लोखंडी कंटेनर वापरले जायचे.
१९०० च्या सुमारास चाहु बाजूनी बंद कंटेनर ची संकल्पना आली.१९२० मध्ये ५ ते १० फुटी कंटेनर यु के मध्ये रेलवे मध्ये वापरले गेले.
१९५५ मध्ये व्यावसायिक आणि ट्रक कंपनीचा मालक malcolm Mclean ने keith Tantlinger या अभियान्त्यासोबत अत्याधुनिक कंटेनर तयार केला.जो पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगा होता.त्यात मोठे आव्हान होते की त्याला बोटीवर चढवता येण्यासाठी आणि बोटीवर हलू नये यासाठी काहीतरी सुविधा हवी.त्यातून ८ फुट उंच,८ फुट रुंद आणि १० फुट लांब असा कंटेनर २५ एम एम च्या स्टील मधून तयार केला गेला.कंटेनर च्या चारी बाजूला twist lock बसवण्यात आले होते.जेणेकरून कंटेनर सोप्या पद्धतीने करेन च्या सहाय्याने हलवता येईल.इथून खरी आंतराष्ट्रीय पातळीवर सुरुवात झाली.
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने हे कंटेनर सैनिकांचे समान वाहून नेण्यासाठी केला (आता दुसरे महायुद्ध कधी झाले हा प्रश्न विचारू नका)
कोरियन युद्धाच्या वेळेस शस्त्रास्त्रे तसेच इतर संवेदनशील गोष्टी वाहून नेण्यासाठी केला गेला.पण लाकडी कंटेनर ची मोड तोड आणि चोरी होणे यामुळे आर्मी ने स्टील च्या कंटेनर ची गरज आहे हे लक्षात आणून दिले आणि तेव्हापासून हे कंटेनर चे बाळ सुधारत गेले.
आता हे कंटेनर २० फुट,४० फुट,४५ फुट,४८ फुट आणि ५३ फुट या आकारामध्ये उपलब्ध आहेत.
भारतात ७५% कंटेनर मार्फत होणारी आयात-निर्यात ही जे एन पी टी आणि चेन्नई वरून होते!!!!!
मग विचार करा जे एन पी टी मध्यंतरी अपघातामुळे बंद होते तेव्हा केवढे नुकसान झाले असेल!!
हे कंटेनर वाहून नेणारी वेगळी जहाजे पण आहेत.त्यांना containerized ships म्हणतात.त्याची एक झलक पाहू....
आता कंटेनर चे प्रकार पुढच्या भागात...........
No comments:
Post a Comment