माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Thursday, 2 September 2010

प्रकार कंटेनर चे ................भाग ५

6) Ventilated Container :हा कंटेनर साध्या कंटेनर सारखाच दिसतो पण फरक हा आहे की याला हवा खेळती राहण्यासाठी झरोके असतात.मुख्यत्वे करून कॉफी च्या बिया आयात -निर्यात करण्यासाठी याचा उपयोग होतो.म्हणून याला कॉफी कंटेनर असेही म्हणतात.
कंटेनर च्या बाहेरील बाजूने असे झरोके असतात.
जिथे बाणाने दर्शवले आहे त्या भागात झरोके असतात..
वरील बाजूचे झरोके या प्रकारचे असतात.
आणि खालच्या बाजूने या प्रकारे झरोके असतात.

Wednesday, 1 September 2010

प्रकार कंटेनर चे..............भाग ४

४)Flatrack: नेहेमीच्या कंटेनर पेक्षा हा वेगळा आहे.कंटेनर प्रकारात मोडत असला तरी वेगळ्या प्रकारचा हा कंटेनर असून ह्यात फक्त दोन बाजूनी बंद असतो.floor आणि दोन side wall चा मिळून हा कंटेनर बनलेला आहे.आणि एकावर एक कार्गो व्यवस्थित बांधून ठेवता यावा यासाठी व्यवस्था केलेली असते.२० आणि ४० फुट या दोन्ही प्रकारात flatrack कंटेनर उपलब्ध आहे.
साधारण या प्रकारचा हा कंटेनर असतो.
 या मध्ये कार्गो बांधण्यासाठी खाचा आणि हुक उपलब्ध आहेत.त्याच्या सहाय्याने कार्गो व्यवस्थित रचून बांधला जातो.या खाचा वरील फोटो मध्ये व्यवस्थित दिसून येत आहेत.
हा कंटेनर अवजड,आकाराने मोठा,असा कार्गो वाहून नेऊ शकतो.कारण असा कार्गो सध्या कंटेनर मध्ये बसू शकत नाही.आणि सध्या कंटेनर मध्ये टाकल्यात कार्गो खराब होऊ शकतो.

५)Platforms :Flatrack कंटेनर सारखाच असतो फक्त त्याला sidewall नसतात.ह्या sidewall दुमडता येण्याजोग्या आणि काढून ठेवता येण्याजोग्या असतात.
अतिशय अवजड कार्गो यावरून वाहून नेता येतो.बेढब आकाराचा कार्गो यावर व्यवस्थित बसू शकतो.उ दा मशिनरी !

सतत प्रवाही  सागराच्या पाण्यामुळे सुद्धा जहाजावर अतिशय अवजड आणि विमानाने सुद्धा न घेऊन जाता येणारा कार्गो flatrack आणि platform च्या सहाय्याने अगदी सहज वाहून नेता येतो."imported  machinery " हे शब्द नेहेमीच आपल्या वाचनात,बोलण्यात येतात.पण ही "imported  machinery "येते कशी हे मला या क्षेत्रामुळे कळलं!!!!आणि तुम्हाला?????

Monday, 30 August 2010

प्रकार कंटेनर चे .........भाग ३

४) open top container : hard top container  प्रमाणेच हा पुढचा प्रकार.फरक इतकाच की छताची बाजू ही स्टील ची नसते. ती ताडपत्रीने झाकलेली असते.त्याचा हेतू एवढच असतो की सूर्यप्रकाश थोड्या-फार प्रमाणात आत यावा आणि दमात हवामानामुळे आतील कार्गो खराब होऊ नये.नाशवंत कार्गो साठी याचा उपयोग होतो.उदा.कांदा,लसूण वगैरे.
हा कंटेनर अश्या प्रकारचा असतो.
या कंटेनर चे जास्तीत जास्त वजन हे २४००० किलो २० फुटी साठी आणि ३०४८० किलो ४० फुटीसाठी ठरवलेले आहे.रिकाम्या कंटेनर चे वजन १८०० ते २४०० किलो २० फुटी चे आणि २८०० ते ४००० आणि ३९०० ते ४२०० किलो असते.म्हणजेच २० फुटी कंटेनर मध्ये २१६०० ते २२२०० किलो पर्यंत कार्गो भरता येतो.आणि ४० फुटी मध्ये २६२८० ते २७६८० किलो कार्गो भरता येतो.यावर जर त्याचे वजन गेले तर तो कंटेनर बाद ठरवण्यात येतो.
क्रमश :

प्रकार कंटेनर चे ...........भाग २

सुरुवातीला साधे कंटेनर प्रकार पाहिले.ज्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो.आता त्या पुढचे जरा सुधारित प्रकार पण आहेत.
३) hard top container :हा दिसायला जरी पहिल्या कंटेनर सारखा असला तरी यात फरक आहे.साध्या कंटेनर चे दार समोरून उघडता येते तसे या प्रकारच्या कंटेनर मध्ये समोरून आणि वरून हा कंटेनर उघडता येतो.कार्गो जर जास्त उंच (overheight  cargo )असेल तर हा कंटेनर वरून उघडा ही ठेऊ शकतो.आणि क्रेन च्या सहाय्याने हा कंटेनर भारता येतो.
पुढील छायाचित्रातून या कंटेनर ची कल्पना येईल.

Saturday, 28 August 2010

प्रकार कंटेनर चे ....भाग १

कंटेनर म्हणजे काय हे तुम्हाला समजल असेलच.आता त्यातही प्रकार असतातच.अश्या या कंटेनर चे १० प्रकार आहेत.
१)standard container :हा सगळ्यात पहिला प्रकार आहे.general purpose साठी याचा उपयोग होतो.२० फुट मध्ये हे कंटेनर असतात.
याला दोन बाजूने दार असतात.याचा नंबर दारावर लावलेला असतो.कंटेनर भरल्यावर बंद केल्यावर एक कुलूप लावण्यात येते.त्याला सील म्हणतात.ते सील या प्रकारचे असते.

या सील वर एक नंबर लिहिलेला असतो.कंटेनर नंबर आणि सील नंबर ला खूप महत्व असते.
 इथे सहज कळेल कि सील कुठे लावतात ते!सरकारी अधिकाऱ्याच्या देखरेखी खाली हे सील लावले जाते.
२) high cube container :हे थोडे लांबीला मोठे असतात.आणि ४० फुटमध्ये येतात.

क्रमश: .............

Thursday, 26 August 2010

क.......क........ .कंटेनर चा

आयात निर्यात क्षेत्रातली बाराखडी चालू करतीये!!आता तुम्ही म्हणाल हि पहिली -दुसरीच्या वर्गाचा  तास गेह्तीये का?पण ही सगळी क्षेत्रच अशी आहेत की बाराखडी पासून शिकावच लागतं!त्या शिवाय पुढे जाताच येत नाही !!!एम एस ची चित्रा च्या अपघात नंतर तुम्ही या कंटेनर गोष्टीशी परिचयाचे असालच.
आता कंटेनर म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एक आयताकृती डब्बा!!तो असा असतो .....
साधारण १७८० च्या आस-पास याची सुरुवात झाली. प्रामुख्याने याचा उपयोग कोळसा वाहून नेण्यासाठी केला जायचा.आणि तो ही नदी किंवा तलावात!!!यासाठी loose boxes वापरले जायचे.१८३० मध्ये छोटे कंटेनर वापरले जायचे.आताच्या तुलनेत हे कंटेनर खूपच छोटे होते.१८४० मध्ये लाकडी आणि लोखंडी कंटेनर वापरले जायचे.
१९०० च्या सुमारास चाहु बाजूनी बंद कंटेनर ची संकल्पना आली.१९२० मध्ये ५ ते १० फुटी कंटेनर यु के मध्ये रेलवे मध्ये वापरले गेले.
१९५५ मध्ये व्यावसायिक आणि ट्रक कंपनीचा मालक malcolm Mclean ने keith Tantlinger या अभियान्त्यासोबत अत्याधुनिक कंटेनर तयार केला.जो पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगा होता.त्यात मोठे आव्हान होते की त्याला बोटीवर चढवता येण्यासाठी आणि बोटीवर हलू नये यासाठी काहीतरी सुविधा हवी.त्यातून ८ फुट उंच,८ फुट रुंद आणि १० फुट लांब असा कंटेनर २५ एम एम च्या स्टील मधून तयार केला गेला.कंटेनर च्या चारी बाजूला twist lock बसवण्यात आले होते.जेणेकरून कंटेनर सोप्या पद्धतीने करेन च्या सहाय्याने हलवता येईल.इथून खरी आंतराष्ट्रीय पातळीवर सुरुवात झाली.
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने हे कंटेनर सैनिकांचे समान वाहून नेण्यासाठी केला (आता दुसरे महायुद्ध कधी झाले हा प्रश्न विचारू नका)
कोरियन युद्धाच्या वेळेस शस्त्रास्त्रे तसेच इतर संवेदनशील गोष्टी वाहून नेण्यासाठी केला गेला.पण लाकडी कंटेनर ची मोड तोड आणि चोरी होणे यामुळे आर्मी ने स्टील च्या कंटेनर ची गरज आहे हे लक्षात आणून दिले आणि तेव्हापासून हे कंटेनर चे बाळ सुधारत गेले.
आता हे कंटेनर २० फुट,४० फुट,४५ फुट,४८ फुट आणि ५३ फुट या आकारामध्ये उपलब्ध आहेत.
भारतात ७५% कंटेनर मार्फत होणारी आयात-निर्यात ही जे एन पी टी आणि चेन्नई वरून होते!!!!!
मग विचार करा जे एन पी टी मध्यंतरी  अपघातामुळे बंद होते तेव्हा केवढे नुकसान झाले असेल!!
हे कंटेनर वाहून नेणारी वेगळी जहाजे पण आहेत.त्यांना containerized ships म्हणतात.त्याची एक झलक पाहू....
आता कंटेनर चे  प्रकार पुढच्या भागात...........

Sunday, 23 May 2010

प्राण्यांची शाळा

आज ३ महिन्यांनी परत आलिये इथे.वाट चुकून!लिहायचं लिहायचं करत राहूनच गेलं.वेळच मिळत नाही हो!(आता वेळ काढायचा असतो हे मीच लोकांना सांगत फिरत असते ती गोष्ट वेगळी!)असो पण आज लिहायला मुद्दाच असा मिळालाय ना की बास!माझी भाचे कंपनी!या वेळच्या सुट्टीचा दौरा माझ्याकडे होता.रोज सकाळी गजर न लावता उठायची सोय झाली होती,रोज संध्याकाळी त्यांची बडबड ऐकणे ,त्यांच्या सोबत खेळणे आणि त्यात त्यांची भांडणे सोडवणे ह उद्योग होता.दिवसभर पिडायला मी सापडलेच नव्हते.पण रविवारी तो योग आला.आणि एकूण ५ जण माझ्या राशीला लागले.सगळे साधारण वय वर्षे ३ ते १० मधले!ही सगळी वरात घेऊन कात्रज सर्पोद्यानात जायचं ठरलं.सोबत मोठी मंडळी पण होतीच.(कारण ही पिल्लावळ घेऊन मी एकटी गेले असते तर ते मलाच हरवून घरी परत आले असते!)
तिथे आम्ही एक एक प्राणी बघत होतो.तिथल्या पाट्या वाचून माहिती घेत होते.(ज्यांना वाचणं शक्य नव्हतं त्यांच्या वाचून दाखवायचं काम अर्थातच माझ होतं)आणि तिथुनच माझ्या परिक्षेला सुरुवात झाली होती!माझं बौद्धिक घ्यायला सुरुवात घरातच झाली होती.सगळ्यांचं आवरुन झालं होतं.माझी गडबड चालु होती खाणं आणि पाण्याच्या बाटल्या,डोक्याचे रुमाल वगैरे साठी!त्यात माझी भाची रुचा आली आणि म्हणाली,"अगं मावशी लवकर आवर नाहीतर ते प्राणी फिरायला जातील!"
मला काय बोलावं तेच कळेना.मी गप्प.हिला काही कळतच नाही या आविर्भावात रुचा पुन्हा म्हणाली,"अगं,आज रविवार आहे ना,मग त्याना शाळेला सुट्टी असणार ना.मग ते फिरायला नाही का जाणार?"
इतक्यात दुसरी भाची सानिका म्हणाली,"प्राण्यांची शाळा कधी असते का?"
मी गार!दोघी माझ्याकडे उत्तरच्या अपेक्षेने बघत होत्या.पण आईने खाऊ साठी बोलावलं आणि मी थोडवेळ सुटले.
तिथे पहिलाच प्राणी बघितला हरीण!आणि यांचे प्रश्न सुरु!
"हरीण झोपते कसे?"
"त्याच्या डोक्यावर शिंग कशी उगवतात?"
मी माझ्या बुद्धीच्या झेपेप्रमाणे(?) जमेल तशी उत्तरे देत होते.
मग बघितली ति निलगाय!तिला निलगाय का म्हणतात याची माहिती सुदैवाने तिथे लिहिलेली होती.पुन्हा मी सुटले.पुढे गेलो कोल्हा,लांडगा बघायला.एकतर मला त्यातला फरक अजुनही कळत नाही.त्यात एकीला ती सगळी नावं इंग्रजी मधे सांगावी लागत होती.(पुन्हा पंचाईत)
आणि तिथे गेल्यावर छोट्या भावाने "ताई,इथे कुत्री कशाला ठेवलियेत ग?"असा प्रश्न टाकला!
पुढे हत्ती बघायला गेलो.भारतीय हत्ती आणि आफ्रिकन हत्ती अश्या दोन पाट्या तिथे होत्या.आणि तिथे दोनच हत्ती होते.दोघेही भारतीय वाटत होते!(हा निष्कर्ष माझा नाही!)
"दोन्ही पण हत्ती इंडियन आहेत ना?आफ़्रिकन बरोबर त्यांचं पटत नसेल म्हणुन त्याना नाही ठेवलय ना इथे?" इति रुचा.
"हो असेल तसं!" मी
पुढे साप बघायला गेलो!सापाला दोघीजणी घाबरत असल्याने जास्त प्रश्न आले नाहीत.पण सुसर-मगर बघत असताना सानिकाचा प्रश्न,"मावशी मगरीला दात किती असतात ग?"
माझी दांडी गुल!तोंड उघडे ठेवुन झोपलेल्या मगरीचे तिने मला दात मोजायला लावले!
कुठल्याच परिक्षेत कधिही नापास न झालेली मी यात मात्र भोपळ्यापेक्षाही कमी मार्काने नापास झाले!
हे प्रश्न कसे सोडवायचे या विचारातच घरी आलो.आणि रुचाला नेमका सकाळचा प्रश्न आठवला."मावशी प्राण्यांची शाळा का नसते ग?त्यांना बोलता का येत नाही?गाण्यातले प्राणी-पक्षी कसे बोलतात?प्राण्यांचा डॉक्टर असतो तर टिचर का नाही?"
मला तरी अजुन या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहियेत.तुमच्या कोणाकडे असतील तर मला नक्की सांगा हं!!!!!